माझा महाराष्ट्र
साधारण प्रेमात अपयश आल्यानंतर युवक-युवती निराश होतात. परंतु नातं तोडणाऱ्या गर्लफ्रेंडला त्यानं आय.ए.एस. होऊन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आणि ते पूर्णही केलं. अशा घटना मात्र फारच विरळ असतात.
रेल्वेत लोको पायलट व्हायचंय ? मग ही महिती पाहिजेच
ही गोष्ट आहे आदित्यची. आदित्य पांडे बिहारमधील पाटण्याचा रहिवासी आहे. त्याचे एका मुलीवर प्रेम होते; परंतु काही काळानंतर त्यांच्या प्रेमात कटुता आली. त्याच्या गर्लफ्रेंडने 'तु खूप वाईट आहेस' असं म्हणत ब्रेकअप केला. परंतु आदित्य यामुळे नाराज झाला नाही. रडत बसला नाही. त्याने मैत्रिणीशी संवाद साधला व एक दिवस आय.ए.एस. होऊन दाखवण्याचे चॅलेंज घेतले.
खून करून टांगला झाडाला मृतदेह : दोघा आरोपींना अटक
आदित्यला तीन बहिणी आणि एक भाऊ, असा मोठा परीवार आहे. तो सर्वात लहान असल्यामुळे त्याचे लहानपणापासून खूप लाड झाले. त्याचे सुरुवातीचे शिक्षण त्याची जामनगर येथील बहीण हिच्याकडे झाले. त्यानंतरचे शिक्षण पाटण्याला झाले. आदित्य हा इंजिनिअर आहे. त्यानंतर त्याने एम.बी.ए. केले. शिक्षण चांगले होते; परंतु त्याच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती.
आता बैलगाडा शर्यतीतही मॅच फिक्सिंग? : वाचा कुठे घडला हा प्रकार
सगळे चांगले चालू असताना आदित्यच्या मैत्रिणीने त्याच्याशी 'तु खूप वाईट आहेस' असे म्हणून ब्रेकअप केले. परंतु ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या ब्रेकअपनंतर किंचितही निराश न होता, त्याने मैत्रिणीला मी एक दिवस आय.ए.एस. होऊन दाखविन, असे चॅलेंज दिले. नुकताच तो देशातील सर्वात अवघड परीक्षांमधील एक असलेली यू.पी.एस.सी. परीक्षा तो पास झाला असून तो देशात ४८वा आला आहे.
If you have any doubt, then contact me