". खून करून टांगला झाडाला मृतदेह : दोघा आरोपींना अटक

खून करून टांगला झाडाला मृतदेह : दोघा आरोपींना अटक

माझा महाराष्ट्र
0

 माझा महाराष्ट्र 

एका अनोळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह झाडाला टांगणाऱ्या दोन आरोपींना मुंबईच्या टिळकनगर पोलिसांनी बुधवारी गजाआड केले. १९ एप्रिल रोजी हा प्रकार समोर आला होता. प्रथम अकस्मात मृत्यु म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

रेल्वेत लोको पायलट व्हायचंय ? मग ही महिती पाहिजेच

टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत पेस्तम सागर परिसरामध्ये १९ एप्रिल रोजी एका झाडाला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा हांडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह राजवाडी हॉस्पिटल येथे शवविच्छेदनाकरता पाठवला होता.

आता बैलगाडा शर्यतीतही मॅच फिक्सिंग? : वाचा कुठे घडला हा प्रकार

पोलिसांनी प्रथम मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे कोणीही ओळखीचे सापडले नाही. तपासादरम्यान या व्यक्तीला दोन जणांनी मारहाण केल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी गौतम ऊर्फ टकल्या जनार्दन बोराडे आणि अफजल सलीम शेख या दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीचा खून केल्याची कबुली दिली.

असा सिनेमा, ज्याने रिलीजआधीच कमावले होते १०० कोटी : सऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका

गौतम ऊर्फ टकल्या जनार्दन बोराडे (२८) आणि अफजल सलीम शेख (२०) अशी आरोपींची नावे आहेत. शिवीगाळ करत असल्याने मद्यधुंद अवस्थेतील या अनोळखी व्यक्तीस आपण मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हत्येचा संशय येऊ नये म्हणून मृतदेह झाडाला टांगून ठेवल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली.

 Body hanged on a tree after murder: Two accused arrested

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)