". रेल्वेत लोको पायलट व्हायचंय ? मग ही महिती पाहिजेच

रेल्वेत लोको पायलट व्हायचंय ? मग ही महिती पाहिजेच

माझा महाराष्ट्र
0



माझा महाराष्ट्र

रेल्वेमधील लोको पायलट हे वरिष्ठ स्तरावरील पद आहे . लोको पायलट ट्रेन चालवण्याचे आणि ट्रेनच्या हालचालीदरम्यान तिची योग्य देखभाल करण्याचे काम करतात . ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही लोको पायलटची असते . त्यामुळे हा प्रतिष्ठेचा जॉब आहे . जर तुम्हाला लोको पायलट व्हायचे असेल , तर आतापासूनच तयारी करावी लागेल . 

परीक्षा पात्रता आणि वयोमर्यादा काय

लोको पायलटच्या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराला थेट लोको पायलट पद दिले जात नाही . भारतीय रेल्वे सहायक लोको पायलट भरतीसाठी एक प्रवेश परीक्षा असते. यानंतर लोको पायलट पदासाठी उमेदवारांना बढती दिली जाते . वेळ आणि अनुभवासह उमेदवाराला वरिष्ठ लोको पायलट पद दिले जाते . लोको पायलट होण्यासाठी उमेदवार १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असावा . या पदासाठी उत्तीर्ण असावा . या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल , इलेक्ट्रॉनिक किंवा ऑटोमोबाइल अशा कोणत्याही ट्रेडमध्ये दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम अनिवार्य आहे . यासाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा . लोको पायलट होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे . आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सवलत दिली जाते . 

या परीक्षा देणे आवश्यक

लोको पायलट होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांत रेल्वेची परीक्षा द्यावी लागेल . 


लेखी परीक्षा 

ही परीक्षा १२० गुणांची असते . ती सोडवण्यासाठी उमेदवारांना ९० मिनिटे देण्यात आली आहेत . त्यात यशस्वी झाल्यानंतरच मुलाखतीसाठी बोलावले जाते . 

मुलाखत 

यामध्ये उमेदवारांकडून या पदाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात . या परीक्षेत जे उमेदवार यशस्वी होतात , त्यांची आरोग्य चाचणी केली जाते . 

वैद्यकीय चाचणी 

यामध्ये अर्जदाराची नेत्र तपासणी अनिवार्यपणे केली जाते . या चाचणीमध्ये , आपण दूरच्या किंवा जवळच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो की नाही , हे पाहिले जाते . या पदासाठी तीनही परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाते .

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)