माझा महाराष्ट्र ( 'वर्क फ्रॉम होम' बंद केले आणि धडाधड पडले राजीनामे )
वर्क फ्रॉम होम work from home ही संकल्पना चांगलीच रुळू लागली आहे. कोरोना काळात विशेष करून आय.टी.च्या Information Technology कर्मचाऱ्यांना गरजेपोटी घरून काम करावे लागले. सुरुवातीला ही मजबुरी वाटत असली, तरी याचे अनेक फायदे दिसू लागले. मात्र आता अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफीसला बोलावून घ्यायला सुरुवात केली आहे. परिणामी विशेष करून महिला कर्मचाऱ्यांचे धडाधड राजीनामे पडू लागले आहेत.
हेही वाचा : तुळजाभवानीच्या दानपेटीत सापडले इतके हिरे : सोने मोजायचे काम अजूही सुरूच
कोरोना काळात वर्क फ्रॉम होम पद्धत सुरू झाली. या पद्धतीमुळे अनेक फायदे दिसून आले. जसे की ऑफिसला जाण्याचा प्रवासाचा वेळ वाचू लागला, तसेच कंपन्यांचाही प्रचंड आर्थिक फायदा झाला. विशेष करून महिलांना याचा जास्त फायदा झाला. घरातली कामे पाहून त्या काम करू शकत होत्या. घरातच ऑफिसचा सेटअप बनवून महिला कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत काम केले. याची या कर्मचाऱ्यांना सवयच झाली आहे.
हेही वाचा : सुप्रिया सुळेंचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या दिशेने पहिले पाऊल : शरद पवारांनी केली घोषणा
कोरोना संपून बराच कालावधी उलटून गेला. आता अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावून घ्यायला सुरुवात केली आहे. यात पुरूष कर्मचारी अनिच्छेने का होईना ऑफिसला जायला तयार झालेत; परंतु महिला कर्मचाऱ्यांनी मात्र त्यास फारशी इच्छा दाखवलेली नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी धडाधड राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. ज्या कंपन्या ऑफिसला बोलावताहेत, त्या सोडून ज्या कंपन्या घरून काम करण्याची परवानगी देताहेत, अशा कंपन्या या महिला जॉईन करत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या कामकाजावर विपरीत परीणाम होणार आहे.
हेही वाचा : आतापर्यंत दोन हजारांच्या इतक्या नोटा आल्या परत : ५००ची नोट सुरूच राहणार
वर्क फ्रॉम ऑफिससाठी अनेक आयटी कंपन्यांनी नवनवीन आयडिया शोधून काढायला सुरुवात केली आहे. काही कंपन्यांनी यासाठी इनडोअर गेम, छोट्या सहली, मोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्या, गिफ्ट, सांस्कृति कार्यक्रमांचे आयोजन अशा सुविधा देण्यास सुरुवात केली आहे; मात्र तरीही महिलांनी ऑफिसला येण्यास नापसंती दर्शवली असून राजीनामे देण्यास प्राधान्य दिले आहे. अजूनही काही महिला कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
हेही वाचा : पोलीस निरीक्षकाने न्यायाधीशांनाच धमकावले : विरोधात निकाल दिल्यामुळे केले हे कृत्य
घरातून काम करताना महिलांना घरातील छोटी छोटी कामे करता येतात. मुलांकडे लक्ष देता येते. प्रवासात वेळ जात नसल्यामुळे स्वत:ला वेळ देता येतो. या वेळेचा सदुपयोग करता येतो. व्यायामाला वेळ देता येतो. घरच्यांना वेळ देता येतो. याउलट ऑफिसमध्ये एकाच जागेवर तासन्तास काम करावे लागते. वाहतूक कोंडीत वेळ जातो. थकवा जानवतो. त्यामुळे महिला घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.
If you have any doubt, then contact me