माझा महाराष्ट्र : ( आतापर्यंत दोन हजारांच्या इतक्या नोटा आल्या परत : ५००ची नोट सुरूच राहणार )
दोन हजार रुपयांची नोट Two Thousand Note मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅँकेने Reserve Bank घेतल्यापासून आतापर्यंत सुमारे १ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या नोटा बॅँकांमध्ये जमा झाल्या आहेत. चलनात असलेल्या एकूण नोटांच्या ही रक्कम निम्मी आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या निर्णयानंतर देशभरात दोन हजारांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; त्यासाठी पुरेशी मुदत देण्यात आल्याने कुठेही या कामासाठी रांगा लागलेल्या नातही. त्यामुळे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कुठेही रांगा लागण्याची शक्यता नाही.
५०० आणि १००० च्या नोटेचे काय ?
दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने परत बोलावल्या आहेत, तेव्हापासून ५०० आणि१०००च्या नोटाही रिझर्व्ह बॅँक परत घेण्याचा निर्णय घेणार असल्याच्या अफवा बाजारात पसरल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले, की ५०० आणि १०००च्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा आमचा कोणताही विचार नाही. यामुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर होणार आहे.
निम्म्या दोन हजारांच्या नोटा जमा
आतापर्यंत नागरिकांनी दोन हजार रुपयांच्या एक लाख ८० हजार कोटी रुपयांच्या नोटा बॅँकेत परत केल्या आहेत. याचा अर्थ चलनात असलेल्या नोटांपैकी निम्म्या नोटा बॅँकेत जमा झाल्या आहेत. हे अपेक्षेनुसारच घडल्याचे गर्व्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितले.
नोटांची छपाई वाढवली
दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे आता पाचशे आणि हजाराच्या नोटांची गरज वाढणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांत ५०० रुपयांच्या १६५ कोटी नोटा छापण्याचं टार्गेट नाशिक नोट प्रेसला देण्यात आले आहे. त्याप्रमाणे नाशिक नोट प्रेसने छपाईचा वेग वाढवला आहे.
दोन हजारच्या नोटेचं गौडबंगाल कायम
डीमोनेटायझेशननंतर केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. मात्र आता या नोटा सरकार मागे घेत आहे. ही प्रक्रिया राबविताना आणि हा निर्णय घेताना कोणतेही पटेल असे कारण सरकारने किंवा रिझर्व्ह बॅँकेने दिलेले नाही. त्यामुळे दोन हजार रुपयांची नोट मागे घेण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
If you have any doubt, then contact me