माझा महाराष्ट्र ( सुप्रिया सुळेंचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या दिशेने पहिले पाऊल : शरद पवारांनी केली घोषणा )
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे Rashtravadi Congress अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी मोठी घोषणा केली असून पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule व प्रफुल्ल पटेल Prafulla Patel यांची नेमणूक केली आहे. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष बनविण्याच्या दिशेने पक्षाने टाकलेले हे पाऊल असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.दिल्ली येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शरद पवार यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याशिवाय इतर नेत्यांवरही अतिरीक्त जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
अजित पवारांचे नाव नाही
शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली आहे; मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं या यादीत नाव नसल्यामुळे याची मोठी चर्चा राज्यात सुरू आहे. यामुळे चर्चांना उधान आलं आहे. या घोषणेच्या वेळी अजित पवार दिल्लीत उपस्थित होते. यानंतर ट्विट करत अजित पवारांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
राजिनामा नाट्यामुळे निवडीला विशेष महत्व
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा दिला होता. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे शरद पवार यांनी राजिनामा मागे घेतला होता. त्यानंतर शनिवारी झालेलं पदांचं वाटप पाहता याला विशेष महत्व आलं आहे. राष्ट्रवादीतील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत, असे शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुल्लभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली, याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून अभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबदद्ध आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे. ते यापुढेही कायम राहील, हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या २४व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतरांनाही नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आदरणीय पवार साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'ऱ्हदयात महाराष्ट्र... नजरेसमोर राष्ट्र...' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं काम करील, हा विश्वास आहे. असं ट्विट अजितदादांनी केलं आहे.
अजून कुणाची झाली निवड ?
सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरच सुनिल तटकरे, डॉ. योगानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, नसीम सिद्दीकी, एस. आर. कोहली यांच्यावर पक्षाने विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
If you have any doubt, then contact me