माझा महाराष्ट्र :
विरोधात निकाल दिल्याचा राग आल्याने एका पोलीस निरीक्षकाने न्यायाधीशांना चक्क त्यांच्या घरी जाऊन धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गडचिरोली Gadchiroli येथे झाला असून राजेश खंडवे असे या वादग्रस्त पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेलीी माहिती अशी, की गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी Chamorshi बाजार समिती निवडणुकीमध्ये 20 एप्रिल रोजी पहाटे पोलीस स्टेशनमध्ये बोलावून पोलीस निरीक्षक राजेश खांडवेने Rajesh Khandve मारहाण केल्याचा आरोप सभापती अतुल गण्यारपवार Atul Ganyarpawar यांनी केला होता. यानंतर खांडेवेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी चमोर्शीत आंदोलन झाले होते. त्यानंतर सभापती गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी 20 मे रोजी खांडवेवर कलम 294, 324, 326, 342 कलमांन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. यानंतर दि. 25 मे रोजी खांडवे हा न्यायाधीश मेश्राम यांच्या घरी गेला. तेथे जाऊन त्याने न्यायाधीशांना माझ्या विरोधात आदेश का दिला, अशी विचारणा केली. त्याला मेश्राम यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; अपिलात जाण्याचा सल्लाही दिला. मात्र तरीही खाडवेने न्यायाधीशांबरोबर हुज्जत घालून त्यांना धमकावले. याप्रकरणीही खांडवेविरोधात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराची वरीष्ठ अधिकाºयांनी गंभीरपणे दखल घेतली व खांडवेचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तात्काळ कारवाई करून या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडे सोपवला.
यानंतर पोलिसांनी पोलीस निरीक्षक खांडवेला 2 जून रोजी उपअधीक्षक साहील झरकर यांनी गडचिरोलीतून ताब्यात घेतले. दुपारी त्याला चामोर्शी न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर खांडवेला चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले.
If you have any doubt, then contact me