धाराशीव Dharashiv जिल्ह्यातील आई तुळजाभवानी Tuljabhavani देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या दाग-दागिन्यांच्या मोजणीमध्ये तब्बल 354 हिरे Diamonds आढळून आले आहेत. सोन्याची Gold मोजणी अजूनही सुरू आहे.
शनिवारी (दि. 10 जून 2023) सकाळी हिºयांची मोजणी करण्यात आली. मोजणी झाल्यानंतर एकूण 354 हिरे भाविकांनी देवीला वाहिल्याचे स्पष्ट झाले. कोट्यवधी रुपये किंमतीचे हे हिरे आहे. सोन्याची मोजणी असूनही सुरूच आहे. यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
सोमवारपर्यंत सुमारे 26 किलो सोन्याच्या दागिन्यांची मोजदाद झाली आहे. एका दिवसात सात ते दहा किलो सोन्याची मोजणी होत आहे. हिरे सापडले असले, तरी ते किती कॅरेटचे आहेत, किंवा त्यांची किंमत किती आहे, हे जाणून घेण्यासाठी वेळ लागणार आहे. जिल्हाधिकाºयांकडून नियुक्त समिती या मोजणीवर लक्ष ठेवून आहे.
तुळजाभवानी मंदिरात वाहिलेल्या दानाची अजून मोजणी झालेली नव्हती. पहिल्यांदाच होत असलेल्या या मोजणीसाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही मोजणी करण्यासाठी विविध खात्याचे अधिकारी मंदिरात उपस्थित आहेत. सुमारे 200 किलो सोने तर चार हजार किलो चांदीच्या वस्तु असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ज्यात डोळे, हात, कान, मोर, वाहने अशा वस्तुंचा समावेश आहे.
If you have any doubt, then contact me