". असा सिनेमा, ज्याने रिलीजच्या आधीच कमावले होते १०० कोटी : सऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका

असा सिनेमा, ज्याने रिलीजच्या आधीच कमावले होते १०० कोटी : सऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र (असा सिनेमा, ज्याने रिलीजआधीच कमावले होते १०० कोटी : सऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका)

बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांनी रेकॉर्ड बनवून कोटींची उड्डाने घेतली; परंतु तुम्हाला माहिती आहे का, की असा एक सिनेमा आहे, ज्याने रिलिजच्या आधीच १०० कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांचा हा सिनेमा आहे. 

पंजाबराव डख हवामान अंदाज : लवकरच सुरू होणार पावसाला सुरुवात

सुपरस्टार मोहनलाल ६३ वर्षांचे आहेत. अजूनही ते चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. अजूनही ते बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करत असून प्रेक्षकही त्यांचे सिनेमे डोक्यावर घेत आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमालीचा यशस्वी ठरतोय. 

िवसा विहीर खोदायची, रात्री मालक साखळदंडाने बांधून ठेवायचा : त्या ११ मजुरांची सुटका

सध्या साऊथच्या सिनेमांसह बॉलिवूडचेही अनेक सिनेमे कोटीच्या कोटी उड्डाने करीत आहेत. अनेक चित्रपटांनी शेकडो कोटी रुपयांचा धंदा केला आहे; परंतु हा व्यवसाय झालाय चित्रपट रिलीज झाल्यानंतर. मोहनलाल यांचा एक सिनेमा असा होता, ज्याने रिलिजच्या आधीच १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता.  

दारुच्या नशेत फुशारकी मारली आणि दिली खुनाची कबुली

मोहनलाल यांच्या नावावर असलेले हे रेकॉर्ड अजूनही कोणता सिनेमा तोडू शकलेला नाही. 'मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी' हे या चित्रपटाचे नाव आहे. हा देशातील पहिला सिनेमा आहे, की ज्याने रिलीजच्या आधीच १०० कोटी रुपये कमावले आहेत. २०२१ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.  

समान नागरी कायद्याबाबत असं काय म्हणाले शरद पवार?

'मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी' या सिनेमानं बॉक्स ऑफीसवर चांगलाच धंदा केला होता. ॲडव्हान्स बुकिंगमधून हा व्यवसाय झाला होता. ॲडव्हान्स बुकिंगमधून १०० कोटी रुपये कमावणारा हा देशातील पहिलाच चित्रपट होता. रिलीजनंतर अनेक चित्रपटांनी मोहनलाल यांच्या या चित्रपटापेक्षा जास्त व्यवसाय केला; परंतु रिलीजच्या आधीच्या व्यवसायाचे या चित्रपटाचे रेकॉर्ड कुणीही तोडू शकले नाही.  

कोण आहेत मोहनलाल? 

मोहनलाल विश्वनाथन हे मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आहेत. त्यांनी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. मल्याळमप्रमाणेच त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी १२ चित्रपटांची निर्म्िातीही केलेली आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द तब्बल ४० वर्षांची राहिली आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर, पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांचा जन्म केरळमधील पथ्यनाम्पिथ्या जिल्ह्यातील एलान्थूर मध्ये वकील असलेल्या विश्वनाथन नायर यांच्या घरी झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब आईच्या घरी स्थलांतरीत झाले. त्यांचा पहिलाच चित्रपट 'थिरनोत्तम' सेन्सॉर बोर्डच्या आक्षेपांमुळे कधी रिलीजच झाला नाही. 'मंजील विरीन्या पुक्कल' हा त्यांचा चित्रपट हिट झाला. यात त्यांची निगेटीव्ह भूमिका होती.

A movie that earned 100 crores even before its release: South superstar Mohanlal's role

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)