माझा महाराष्ट्र ( दिवसा विहीर खोदायची, रात्री मालक साखळदंडाने बांधून ठेवायचा : त्या ११ मजुरांची सुटका )
दिवसभर विहीर खोदायला लावायची व पळून जाऊ नये म्हणून रात्री साखळदंडाने बांधून ठेवायचे व मारहाण करायची. असा छळ सोसत असलेल्या त्या ११ मजुरांची नुकतीच सुटका करण्यात आली आहे.
ही घटना एखाद्या चित्रपटातील नाही, तर धाराशीव जिल्ह्यातील आहे. जालना व वाशिम जिल्ह्यातील ११ मजूर विहीर खोदायचे काम करत होते. एका ठेकेदाराकडे हे काम करत होते. हा ठेकेदार या मजुरांकडून दिवसभर १२ तास विहीर खोदायचे काम करून घ्यायचा. रात्री हे मजूर पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाला साखळदंडाने बांधून ठेवायचा. वरून त्यांना मारहाणही करायचा. मजुरांना राहाण्याच्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांना जेऊ घालण्यात यात असे, नंतर त्यांना दारू पाजून झोपी लावले जायचे.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या ११ मजुरांची सुटका केली. या मजुरांचा छळ करणाऱ्या ठेकेदरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या मजुरांना मारहाणही केली जात होती.
धाराशीव तालुक्यातील वाखरवाडी येथे संदीप रामकिसन घुसके (रा. कवठा, ता. सेनगाव, जिल्हा हिंगोली) हा ठेकेदार धाराशीव जिल्ह्यातील वाखारवाडी येथे या मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेत होता. पोलिसांना माहिती मिळताच ते मजुरांना ठेवलेल्या ठिकाणी पोहोचले. येथे या ११ मजुरांना साखळदंडाने बांधून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी सर्वांची सुटका केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की एका व्यक्तीला साखळदंडाला बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही तेथे एक पथक तपासासाठी पाठवले. तिथे पाच मुले विहिरीत काम करत होते. त्या मुलांनी सांगितले, की आमच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात असून रात्री साखळदंडाने बांधून ठेवले जाते. आमच्यासह आणखी सहा मुलांनाही असेच बांधून ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या सर्व मुलांना पोलीस ठाण्यात आणले.
Digging a well during the day, chained by the owner at night: the release of those 11 laborers
If you have any doubt, then contact me