माझा महाराष्ट्र
देशात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या सुरू असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. विधी आयोगाने नागरिकांकडून समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सूचना मागवल्या आहेत. याबाबत नुकतेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
समान नागरी कायदा आणण्याच्या हालचालींवर शरद पवार यांनी आपले मत नुकतेच व्यक्त केले. पवार यांनी म्हटलंय, ‘‘सध्याचा देश् पातळीवरील असलेल्या पक्षाची विचारधारा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे समान नागरी कायद्यासारखे सगळे मुद्दे घेऊन एक वेगळं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अजून याचा प्रस्ताव संसदीय समितीसमोर किंवा संसदेत आणण्यात आलेला नाही. ज्यावेळी हा प्रस्ताव येईल, त्यावेळी याची चर्चा होईल. हा येणारा कायदा नेमका कोणत्या स्वरुपाचा आहे, त्यात एखादा समाज, धर्म किंवा जात टार्गेट केली जात आहे का, हे पाहावं लागेल. त्यामुळे या कायद्याचा मसुदा जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही.
What did Sharad Pawar say about the Equal Civil Act?
If you have any doubt, then contact me