माझा महाराष्ट्र
आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच दिवशी येत आहेत. या दिवशी हिंदू धर्मियांच्या भावनांचा विचार करून त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम मांधवांनी घेतला आहे.
दारुच्या नशेत फुशारकी मारली आणि दिली खुनाची कबुली
मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सणव हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत आहे. या दिवशी मुस्लिम कुर्बानी देतात तर हिंदू धर्मिय आषाढी एकादशीला उपवास धरतात. त्यामुळे एकादस ठेवणाऱ्या नागरिकांचा सन्मान ठेवत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या बेलापूर गावातील मुस्लिम बांधवांनी हा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
असा सिनेमा, ज्याने रिलीजआधीच कमावले होते १०० कोटी : सऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांची भूमिका
बेलापूर येथे नुकतीच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी येथील मस्लिम बांधवांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वधर्मिय नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे हिंदू नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
no Qurbani on Ashadhi Ekadashi : decision of some Muslim brothers
If you have any doubt, then contact me