तुळजापूर Tuljapur येथील आई तुळजाभवानी मंदिरातील Tuljabhavani Mandir भाविकांनी अर्पन केलेल्या दानाचे मोजमाप सुरू झाले आहे. सुमारे २०० किलो सोनं Gold आणि ४ हजार किलो चांदी Silver जमा झाल्याचा अंदाज आहे. महिनाभर या दानाचं मोजमाप सुरू राहणार आहे. यातील २०० किलो सोनं वितळवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अजूनही मोजदाद सुरूच आहे.
आतापर्यंत दोन हजारांच्या इतक्या नोटा आल्या परत : ५००ची नोट सुरूच राहणार
कधी मोजणी झालीच नाही
तुजाभवानीला राज्यभरातून लोक येतात. अनेक भाविक काही ना काही नवस करीत असतात. हे नवस फेडण्यासाठी भाविक मंदिराला मोठ्या प्रमाणात दान देतात. परंतु अनेक वर्षांपासून या दानाचं मोजमाप झालेलं नव्हतं. आता ही मोजणी सुरू झाली आहे. ही मोजणी पहिल्यांदाच होत आहे. यात अंदाजे २०० किलो सोनं व ४० किलो चांदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरबीआय वितळवणार सोनं
सोनं वितळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठीही महिनाभर काम सुरू राहणार आहे. रिझर्व्ह बॅँकेतर्फे reserve bank of india हे सोने वितळून दिले जाणार आहे. दि. ७ जूनला पहिल्या दिवशी सकाळी १० ते ६ तीन किलो सोन्याच्या दागिन्यांचे मोजमाप करण्यात आले. यासाठी मुंबई Mumbai येथील सुवर्णकाराची नियुक्ती मंदिर प्रशासनाने केली आहे. इन कॅमेरा हे मोजमाप सुरू आहे.
मोजमाप करणाऱ्यांच्या कपड्यांना खिसे नाहीत
सोने आणि चांदीचे दागिने मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना खास ड्रेस कोड Dress Code दिला गेला आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शर्ट आणि पॅँटला एकही खिसा नाही. या कर्मचाऱ्यांची आत जाताना आणि बाहेर येताना तपासणी केली जात आहे.
समिती ठेवतेय लक्ष
या मोजणी प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी District Majistrate तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. ओम्बासे यांनी एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीत नायब तहसीलदार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी, अमरराजे कदम, अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ, सज्जनराव साळुंके अध्यक्ष पाळीकर पुजारी मंडळ, अनंत कोंडो अध्यक्ष उपाध्ये पुजारी मंडळ, स्टेट बॅँकेचे सोनार आदींचा समावेश आहे.
याआधी दागिने झाले गायब
२००१ ते २००५ या काळात मंदिरातील सोने-चांदीचे मौल्यवान दागिने गायब झाले आहेत. मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक राजाभाऊ दीक्षित यांच्या निधनानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता त्यांच्या घरून चाव्या आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर किशोर गंगणे यांनी केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी चौकशी होऊन पाच जणांना दोषी धरण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
If you have any doubt, then contact me