माझा महाराष्ट्र :
वाहन चालवताना रस्त्यावर डाव्या बाजूने चालावे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे; परंतु पायी चालतानाचे काय नियम आहेत, हे मात्र अत्यंत कमी लोकांना माहिती आहे. केवळ हा नियम माहिती नसल्याने भारतात रोज शेकडोने अपघात होतात. अनेक जण जखमी होतात, तर अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे येथे आपण जाणून घेऊ भारतात पायी चालण्याचे नियम कोणते आहेत?
पोलिसाच्या स्कुटीचा पोलिसांनीच केला लिलाव : लिलाव घेणारी पोलिसाचीच बायको
भारतात वाहन चालविणारे रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवतात. त्यामुळे बहुतांशी लोक रस्त्यावर चालताना डाव्या बाजूनेच चालतात. पायी चालणाऱ्यांनाही असे वाटते की आपल्यासाठीही तोच नियम आहे; परंतु खरंच तसे आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. वाहतुकीचे नियम फक्त वाहनांनाच नसतात, तर सर्वांसाठीच असतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
काय आहे मग नियम?
☛भारतात रस्त्याने पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचे असते. सुरक्षेच्या दृष्टीने तर हे आवश्यक आहेच; परंतु शासनाचे नियमही हेच सांगतात, की रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चालले पाहिजे.
☛चालणाऱ्याने चालण्यासाठी सर्वप्रथम फुटपाथला प्राधान्य दिले पाहिजे; परंतु आपल्याला माहितीये की भारतातील किती रस्त्यांवर फुटपाथ आहेत. त्यामुळे फुटपाथ नसेल, तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. म्हणजे समोरून येणारी वाहने आपल्याला दिसतील आणि आपण सुरक्षितपणे चालू शकू.
☛डाव्या बाजूने चालले, तर मागून येणारी वाहने आपल्याला दिसणार नाहीत आणि मागून येणाऱ्या या वाहनांना आपल्या वेगाचा अंदाज न असल्याने ते आपल्या अंगावर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. वाहनाचा वेगही जास्त असल्यामुळे पायी चालणारे लोक वाहनचालकांना लवकर दिसत नाहीत.
पायी चालणाऱ्यांसाठी इतर नियम काय सांगतात?
☛रस्त्यावर येण्याआधी सर्वात पहिले रस्त्याच्या दोन्ही बाजुला बघून घ्या.
☛लहान मुलं बरोबर असतील, तर त्यांचा हात घट्ट पकडन्ूा ठेवा व त्यांना रस्त्याच्या बाहेरच्या बाजुला चालायला लावा.
☛फुटपाथ असेल, तर फुटपाथवरच चाला.
☛फुटपाथ नसेल, तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला.
☛रस्ता क्रॉस करताना जेथे क्रॉसिंग असेल, तेथूनच क्रॉस करा.
☛जेथे क्रॉसिंग नसेल, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाहून खात्री झाल्यावरच रस्ता क्रॉस करा.
☛चालताना रस्त्यावरच लक्ष ठेवा, इकडे तिकडे पाहू नका.
☛रात्री पायी चालताना चमकदार कपडे, टोपी, रुमाल किंवा काठी जवळ ठेवा, जेणेकरून वाहनचालकांना आपण अंधारातही स्पष्ट दिसू.
☛चौकातून रस्ता क्रॉस करताना ट्राफिक थांबलेली असतानाच रस्ता क्रॉस करा.
☛रस्ता क्रॉस करताना झेब्रा लाईनवरूनच क्रॉस करा.
शेतात काम करणाऱ्या आईला भेटायला आला डीएसपी लेक : दोघांमधील संवाद झाला व्हायरल
सकाळी चालणाऱ्यांनो सावधान
एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की पायी चालणाऱ्यांचे जास्तीत जास्त अपघात सकाळी मॉर्निंग वॉक अथवा जागिंग करणाऱ्यांचेच होत आहेत. याचे मूळ कारण हेच आहे, की यातील बहुतांशी लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असतात. सकाळी वाहनांचा वेग जास्त असतो. आणि पहाटे आणि सकाळी रस्त्यावर दृष्यमान्यताही कमी असते. त्यामुळे सकाळी रस्त्यावर जॉगिंग करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेऊन रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.
व्हीप म्हणजे काय? येथे जाणून घ्या
जनजागृती करण्याची गरज
रस्त्याने चालताना कोणत्या नियमांचे पालन करावे, याबाबत बहुतांशी लोकांना माहितीच नाही. कारण यासंबंधीची माहिती सहजासहजी मिळत नाही. शाळांमधूनही ही गोष्ट शिकवली जात नाही. त्यामुळे या नियमांबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज आहे.
If you have any doubt, then contact me