". नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट

नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र 

सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. परिणामी गोदावरी नदीला पूर आला असून हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केला आहे. सखलभागात राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचा👉कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहरातही अनेक भागात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे जवळपास भरत आली आहेत. 

हे वाचा👉महिनाभर आमदारांची चालणार कुदळ

नाशिक मधील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागत आहे. इतरही अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. गंगापूर धरणातून 8000 क्यू सिक्स ने गोदावरीत पाणी सुरू आहे. कळवण तालुक्यातील धनोली धरण पूर्ण भरून ओव्हरलोड झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील पुणे गाव धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. 

हे वाचा👉आम्हीही याच देशात राहतो : कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक

 नाशिक जिल्ह्यातील 572 दशलक्ष घनफूट क्षमतेचे केळझर धरण पूर्ण भरले आहे. नाशिकच्या कर्जाणा तालुक्यातही पावसाने कहर माजवला आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहे . परिणामी दळणवळण विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी मुलांना शाळेत जाणे अवघड बनले आहे. आजारी रुग्णांचे हाल होत आहेत. 

हे वाचा👉विम्यावरील जीएसटी रद्द करा : केंद्रीय मंत्री गडकरी यांची मागणी

धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. साखळी तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक धरणे ओव्हरप्लो होण्याच्या मार्गावर आहेत. अक्कलपाडा धरणातून सहा हजार क्युसेकने पाण्याचे विसर्ग सुरू आहे. 

हे वाचा👉कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?

अजूनही पावसाच्या शक्यतेमुळे नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे . हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर . अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट दिलाय.  

हे वाचा👉विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)