". या आमदाराने वाटल्या सात हजार सायकली आणि बरंच काही : शरद पवारांनी केले कौतूक

या आमदाराने वाटल्या सात हजार सायकली आणि बरंच काही : शरद पवारांनी केले कौतूक

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील निघोज येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी तब्बल सात हजार सायकलींचे वाटप केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे व पारनेरकरांच्या लंकेंवरील प्रेमाचे पवार यांनी तोंड भरून कौतूक केले.

रस्त्यावर पायी कोणत्या बाजुने चालावे? : येथे जाणून घेऊ

काय म्हणाले शरद पवार?

आमदार निलेश लंके यांनी पारनेर-नगर मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून पारनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. कोरोना काळात हजारो लोकांना जीवनदान देऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रम राबवत तालुक्याचा नावलौकीक वाढवला असून संघर्षशील पारनेरला लंके याच्या रुपाने सोन्याचा माणूस लाभला आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी लंके यांच्या कार्याचा गौरव केला.

शेतात काम करणाऱ्या आईला भेटायला आला डीएसपी लेक : दोघांमधील संवाद झाला व्हायरल

कशा कशाचे झाले वाटप

आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते तब्बल सात हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. याचवेळी १०० घरकुलं आणि ५० व्यावसायिक वाहनांचे वाटप करण्यात आले. पारनेर या ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोठी पायपीट करत शाळेत जावे लागते. आता तब्बल सात हजार गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार आहे.

कोरोना काळातील कार्याचीही आठवण

आमदार निलेश लंके यांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे असून पारनेरकर जनतेनेही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, असे आाहन पवार यांनी केले. खासदार पवार व आमदार वळसे पाटील यांनी लंकेंच्या कोरोना काळातील कार्याची आठवण काढून त्यांच्या कामाचे तोंड भरून कौतूक केले.


काय म्हणाले आमदार लंके

यावेळी आमदार लंके म्हणाले, शरद पवार यांचा हात डोक्यावर असल्याने कोणत्याच कामात अडचण येत नाही. भविष्यात त्यांच्याच पाठबळावर तालुक्यात भव्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मानस आहे. मी माझे सर्व हट्ट पवार साहेबांकडून पुरवून घेतो, असेही लंके म्हणाले.


तीन कोटीच्या अभ्यासिका

आमदार निलेश लंके यांनी नीलेश लंके प्रबोधिनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन कोटी रुपये खर्च करून निघोज व कान्हुर पठार येथे तीन कोटी रुपयांच्या दोन अभ्यासिका उभारल्या आहेत. येथे केवळ ९९९ रुपयांत अभ्यासासाठी सुविधा देण्यात आली आहे.


आमदार निलेश लंकेंबद्दल थोडे

निलेश लंके हे सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. २०१९ मध्ये ते पारनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडन्ूा गेले. त्यांनी राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतलेली आहे. त्यांच्या भागातील लोक त्यांना प्रेमाने 'नेते' म्हणतात. कोविड महामारीच्या काळात त्यांनी एक नाही दोन नाही १०० नाही, तब्बल एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारले. या माध्यमातून त्यांनी लाखो रुग्णांना मोफत उपचार दिले. हंगा या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड होती. त्यामुळे परिसरात ते पहिलवान म्हणूनच परिचित होते. सुरुवातीला त्यांनी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चा पॅनल उभा करून ११ जागांवर विजय मिळवला; परंतु त्यांचे वय कमी असल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती.

निलेश लंके या वादळाचा प्रवास कायम संघर्षाचा राहिला आहे. कधीही रिचेबल असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेरही त्यांचे हजारोंनी चाहते आहेत. वाढदिवस पारनेरात साजरा होत असला तरी फटाकडे संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही वाजतात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तरुणपणीच त्यांना पारनेरचे तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २०१० साली ते सरपंच झाले. २०१२ साली त्यांच्या पत्नी राणीताई या पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून आाया. पुढे त्या उपसभापती झाल्या. २०१७ साली त्या जिल्हा परीषदेवर निवडून गेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य झाल्या. एका सभेत झालेल्या दगडफेकीचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडण्यात आल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१८च्या त्यांच्या वाढदिवशी सुमारे ३० हजार लोक समा झाले होते. त्याच दिवशी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी २०१९ची विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मताधिक्याने निवडून येत इतिहास रचला. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)