". पोलिसाच्या स्कुटीचा पोलिसांनीच केला लिलाव : लिलाव घेणारी पोलिसाचीच बायको

पोलिसाच्या स्कुटीचा पोलिसांनीच केला लिलाव : लिलाव घेणारी पोलिसाचीच बायको

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र :

एका पोलिसाच्या चोरी गेलेल्या स्कुटीचा दोन पोलिसांनीच लिलाव केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही स्कुटी पोलीस कर्मचाऱ्याच्या बायकोनेच खरेदी केली. या वाहनावर नियम भंग केल्याप्रकरणी ऑनलाईन दंड झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा : अधिकाऱ्यावर उगारला होता हात

स्कुटीचा लिलाव करणाऱ्या पोलिसांपैकी रवी नावाचा पोलीस कर्मचारी बंगळुरू शहर पोलीस आयुक्त कार्यालयात नियुक्तीस असून दुसरा राजीव नेमांगला शहरात पोलीस निरीक्षक आहे. 

या गावातील शेतकर्‍यांनी गावच काढले विकायला : यामुळे घेतला टोकाचा निर्णय

दिनांक 12 ऑगस्ट 2020 रोजी नागार्जुन नावाच्या कॉन्स्टेबलची स्कुटी त्याच्या कम्मागोंडानाहल्ली येथील घराच्या बाहेर अंगणातून चोरी झाली होती. त्यानंतर नागार्जुन यांनी 8 नोव्हेंबर रोजी गंगम्मनगुडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण दोघा पोलिसांनी स्कुटीचा 4 नोव्हेंबरलाच लिलाव केला होता . 

Realme घेऊन येत आहे 'मिनी कॅप्सूल' स्मार्ट फोन C55

या प्रकरणातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरीची केस पोलिसांनी 'स्कुटी सापडत नाही' असे सांगून बंद केली होती. त्याच स्कुटीचा पोलिसांनीच लिलाव केला.

अशी सापडली स्कुटी

राज्य सरकारने वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंडामध्ये 50% सूट दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नागार्जुन यांनी सहजच आपल्या चोरीला गेलेल्या स्कुटीचा नंबर ऑनलाईन टाकून पाहिला, तर त्यांना असे , की स्कुटीवर नियम तोडल्याचा एक दंड झालेला आहे. स्कुटीवर एक महिला विना हेल्मेटची फिरतानाचा फोटो त्यांना दिसून आला. नागार्जुन यांनी त्या महिलेचा तातडीने पत्ता शोधला. ती महिला पोलीस कर्मचारी रवीचीच बायको निघाली. याच रवीने स्कुटीचा लिलाव केला होता. त्यानंतर नागार्जुन यांनी रवी आणि राजीवला गाठले आणि विचारणा केली. यावेळी तिघात वादही झाले; पण नागार्जुन यांनी तक्रार दाखल केली नाही.

व्हीप म्हणजे काय? येथे जाणून घ्या

नागार्जुन यांनी तक्रार दाखल केली नसली, तरी याबाबतीत छापून आलेली एक बातमी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने वाचली. त्यानंतर या अधिकाऱ्याने या घटनेची स्वतःहून दखल घेऊन या तिघांचीही चौकशी केली. स्कुटीचा लिलाव करणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. आता ती स्कुटी नागार्जुनला परत मिळाली आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)