". विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?

विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र

चोरही आता हाय प्रोफाईल झाले आहेत. विमानाने येऊन चोरी करून पुन्हा विमानानेच परत जाणारा एक चोर ठाणे पोलिसांच्या गळाला लागला आहे. वागळे इस्टेट भागात त्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याची चौकशी केल्यानंतर तो एक हायप्रोफाईल चोर असल्याचे समोर आले आणि पोलीसही चक्रावले. 

हे वाचा👉पाहा भंडारदरा धरण किती भरले

 राजू मोहम्मद जेनाल शेख उर्फ बंगाली हा मूळचा त्रिपुरा येथील राहणार आहे. तेथून तो विमानाने मुंबई व ठाणे येथे यायचा व चोरी करायचा. मुंबईला आल्यानंतर तो ड्रेनेच्या पाईपमध्ये मुक्काम ठोकायचा. 

हे वाचा👉कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?

ठाणे पोलिसांनी वागळे इस्टेट भागात गेल्या आठवड्यात अर्थात २५ जुलै रोजी एका त्याला अटक केली. हा चोर एका ज्वेलरकडे चोरलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी आला होता. पोलिसांना याची खबर लागताच सापळा रचून या चोराला अटक केली. 

हे वाचा👉विम्यावरील जीएसटी रद्द करा : केंद्रीय मंत्री गडकरी यांची मागणी

मुंबई किंवा ठाणे येथे आल्यानंतर तो जिथे चोरी करायची आहे तिथे रेखी करायचा. संधी साधून चोरी करायचा. चोरी केलेले दागिने स्थानिक सराफांना विकायचा.आलेले पैसे घेऊन पुन्हा विमानाने घरी परत जायचं .

पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये बंगाली याने सात वेळा अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे समोर आला आहे.यासाठी त्याने सातही वेळा विमानाने प्रवास केला आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक लाख 13 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्याची पॉवर माहिती आहे? : येथे जाणून घ्या

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)