". जिल्हाधिकाऱ्याची पॉवर माहिती आहे? : येथे जाणून घ्या

जिल्हाधिकाऱ्याची पॉवर माहिती आहे? : येथे जाणून घ्या

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :
जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहून देशभरातून लाखो तरून दरवर्षी यू.पी.एस.सी.ची परीक्षा देतात. त्यातील काहीच जिल्हाधिकारी होतात. आज आपण जाणून घेऊ, जिल्हाधिकाऱ्यांना काय सुविधा व अधिकार असतात व विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांना काय पॉवर असतात ते.



जिल्हा पातळीवरील सर्वात मोठे पद म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची पोस्ट. जिल्हाधिकारी हे आय.ए.एस. अधिकारी असतात. जिल्हाधिकाऱ्यावर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली असते. जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा दंडाधिकारी म्हणूनही ओळखले जाते. जिल्हाधिकाऱ्यांला महसूल, मदत आणि पुनर्वसनाचे काम, जिल्हा बॅँकर समन्वय समितीचे अध्यक्षपद, जिल्हा नियोजन केंद्राचे अध्यक्षपद, पूसंपादन आणि जमीन महसूल गोळा करणे, जमीन अभिलेखांशी संबंधित यंत्रणेची जबाबदारी, जमीन अधिग्रहन, कृषी कर्जाचे वितरण, उत्पादन शुल्क, सिंचन, आयकर थकबाकी आणि इतर अनेक कामे करावी लागतात. जिल्हा पोलीस प्रमुखांबरोबर समन्वय ठेवून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवर असते.

सातव्या वेतन आयोगानुसार जिल्हाधिकाऱ्यांना महिन्याला सुमारे ८० हजार रुप्यो वेतन व इतर भत्ते मिळतात. कॅबिनेट सचिवपदापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे वेतन अडीच ते तीन लाखांपर्यंत जाते. याबरोबरत जिल्हाधिकाऱ्याला राहण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी बंगलाही दिला जातो. घरकामासाठी नोकरही असतात. जिल्ह्यात फिरण्यासाठी शासकीय वाहनही दिले जाते. हे वाहन चालविण्यासाठी चालकही पुरवला जातो. याशिवाय बंगल्यावर माळी, शिपाई, आचारी व इतर कामांसाठी नोकर दिले जातात. 

जिल्हाधिकाऱ्यांला अजूनही अनेक कामे करावी लागतात, जसे की बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार दत्तक घेण्याचे आदेश जारी करणे, शस्त्रास्त्र कायदद्यांतर्गत शस्त्रे बाळगण्याची परवानगी देणे, चित्रपटगृहांना परवाना देणे, फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कलमांतर्गत खटल्यांची सुनावणी घेणे, जिल्ह्यातील पोलीस ठाणे, कारागृह व बालगृहांची तपासणी करणे, कैदद्यांना पॅरोल मंजूर करणे, सरकारी वकील आणि अतिरीक्त सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी पॅनेल तयार करणे, दंगली किंवा बाह्य आक्रमणासंबंधी संकट आल्यास व्यवस्थापन करणे, बालकामगार रोखणे अशी अनेक कामे जिल्हाधिकाऱ्यांला करावी लागतात.

जिल्हाधिकारी बनण्यासाठी यू.पी.एस.सी.ची अत्यंत कठीण परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवाराची आय.ए.एस. मध्ये निवड केली जाते. जिल्हाधिकाऱ्याला प्रचलित भाषेत कलेक्टरही म्हणतात. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणूनही जिल्हाधिकारी ओळखला जातो. यू.पी.एस.सी. पास झाल्यानंतर उमेदवाराची मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फाउंडेशनमध्ये ट्रेनिंग होते.

असं म्हटलं जातं, की जर जिल्हाधिकाऱ्यांनी खरोखरच आपल्या अधिकारांचा उपयोग केला, तर मुख्यमंत्र्यालाही जिल्ह्यात प्रवेश नाकारू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारीत जिल्ह्यातील प्रत्येक विभाग येतो. जिल्ह्यातील सर्व विभागांचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. जिल्हाधिकारी कधीही कोणत्याही विभागाची अथवा कार्यालयाची तपासणी करू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांची फक्त मुख्यमंत्रीच बदली करू शकतो, मात्र त्यांना सस्पेंड करू शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)