". महिनाभर आमदारांची चालणार कुदळ !

महिनाभर आमदारांची चालणार कुदळ !

माझा महाराष्ट्र
0

 

माझा नहाराष्ट्र

थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. त्यानंतर कोणत्याही शासकीय कामाचे उद्घाटन होऊ शकणार नाही. पार्श्वभूमीवर महिनाभरात विविध कामांच्या उद्घाटनांचे देव फुटणार आहे.

पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धडाधड निर्णय होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे आधीपासून मंजूर झालेली कामे व घाईने मंजूर करण्यात येत असलेली कामे या सर्वांची उद्घाटने आता घाईघाईत उरकून घेण्यात येतील. सर्व आमदार येत्या महिनाभर आपापल्या मतदारसंघात विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन करताना दिसतील. कारण आचारसंहितेमध्ये कुठल्याही विकास कामाचे उद्घाटन अथवा भूमिपूजन करता येत नाही.

पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला

आमदारांना आता येत्या काही महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी लोकांकडे मते मागायला जावे लागणार आहे. मत मागताना आपण किती विकास कामे केली किती निधी आणला याचा हिशेब लोकांसमोर ठेवावा लागतो. कोण किती निधी आणतो व कोण किती कामे मंजूर करून आणतो यावर त्यांचा विजय अथवा पराजे अवलंबून असतो. त्यामुळे अत्यंत घाईने लोकप्रतिनिधी विकास कामांची उद्घाटने करत फिरताना दिसतील.

जिल्हाधिकाऱ्याची पॉवर माहिती आहे? : येथे जाणून घ्या

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)