". विधानसभेला शरद पवार देणार तरुणांना संधी

विधानसभेला शरद पवार देणार तरुणांना संधी

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र :

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला उभं करायचं, याच्या चर्चा सर्वच पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी सुरू केल्या आहेत; परंतु अजून कुणी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. फक्त अपवाद खासदार शरद पवार यांचा. यावेळी ते बहुतांशी तरुण उमेदवारांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे . हे नव्या दमाचे तरूण उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभे राहाणार आहेत.

पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द

निवडणूक म्हटलं, की शरद पवार यांचा उल्लेख केल्याशिवाय ती पूर्णच होत नाही. आजपर्यंत शेकडो निवडणुकांचा अनुभव शरद पवार यांच्या गाठीशी आहे. अनेक मातब्बर पैलवानांना त्यांनी चितपट केले आहे. त्यामुळे पवार कधी काय निर्णय घेतील, हे कुणीही सांगू शकलेलं नाही. 

जिल्हाधिकाऱ्याची पॉवर माहिती आहे? : येथे जाणून घ्या

तरूण उमेदवार उभे करण्यामागेही निश्चितच पवार यांचे दूरगामी धोरण असणार आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक दिवसही आराम न करता पवार यांनी विधानसभा लक्ष्य ठेवून आख्खा महाराष्ट्र पालथा घातला. यादरम्यान त्यांनी अनेक तरूण उमेदवार हेरले आहेत.

कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)