". पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला

पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र 

पूजा खेडकर यांनी केलेल्या गैरप्रकारांनी यूपीएससीला चांगलंच कामाला लावलं आहे. यूपीएससीने गेल्या पंधरा वर्षातील पंधरा हजार दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी केली. या 15000 प्रमाणपत्रांमध्ये केवळ पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबाबतच घोळ झाल्याचे
आढळले आहे.

गेल्या काही वर्षात देशभरामधील अनेक परीक्षांमध्ये घोटाळे झाले. याचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा उमटले. हा गोंधळ सुरू असतानाच पूजा खेडकर यांचे प्रकरण बाहेर आले. पुण्यातील काही जागरूक नागरिकांमुळे हे प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात विशेष करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हडकंप माजला. यूपीएससीच्या विश्वासार्हते वरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारवरही प्रचंड दबाव होता.

पूजा खेडकर प्रकरणात केवळ दिव्यांग प्रमाणपत्र बाबतच नव्हे तर इतर अनेक गोष्टींबाबत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. यात अनेक मोठे वरिष्ठ अधिकारी गुंतलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याची चौकशी होईलच; परंतु युपीएससीला मात्र या प्रकरणाने चांगलेच कामाला लावले.

यूपीएससीने गेल्या 15 वर्षांतील, 2009 ते 2015 या दरम्यानच्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची छानणी केली. यामध्ये केवळ पूजा खेडकर यांचे प्रमाणपत्रच बनावट निघालं. त्याचबरोबर खेडकर यांनी मर्यादेपेक्षा जास्त वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचेही समोर आलं. यासाठी पूजा यांनी स्वतःचं नाव तर बदललंच, पण आई-वडिलांच्या स्पेलिंगमध्ये बदल करून यूपीएससीची फसवणूक केली. 

पूजा खेडकर प्रकरणासंबंधी UPSC ने 2009 ते 2023 पर्यंत म्हणजेच मागील 15 वर्षात 15,000 उमेदवारांची माहिती तपासली. त्यामध्ये पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याही उमेदवाराने नियमानुसार परीक्षेच्या दिलेल्या प्रयत्नांपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्याचं दिसून आलं नाही. ओबीसीतून 9 प्रयत्न संपल्यानंतरही पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रवर्गातून दोन वेळा परीक्षा दिल्या. हा प्रकार घडल्यानंतर इथून पुढे कागदपत्रांची पडताळणी आता अधिक कठोरपणे करणार असल्याचे यूपीएससीने जाहीर केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)