माझा महाराष्ट्र : (कधी नाही पडला इतका पाऊस या भागात पडणार : पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज)
हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख Panjabrao Dakh यांचा मान्सूनबाबतचा Mansoon अंदाज जाहीर झाला आहे. राज्यात ३ जूनपासून पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, पैठण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बार्शी, बीड, पुणे या भागात खूप पाऊस पडणार आहे. इथून मागे जेवढा पाऊस या भागात पडलेला नाही, असा पाऊस या वर्षी या भागात पडणार आहे, असा अंदाज डख यांनी दिला आहे.
पावसाबाबत डख यांनी सांगितले आहे, की या पावसामध्ये वादळी वारा असेल आणि शेतामध्ये पाणी साचेल, असा हा पाऊस असणार आहे. येत्या ८ जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होत आहे. हा पाऊस राज्यात ठिकठिकाणी बदलत पडणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ या भागात ३ जून ते १० जून दरम्यान बदलत बदलत हा पाऊस पडणार आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असणार आहे. मान्सूनचा पाऊस राज्यात ८ जून आणि ९ जूनला येणार आहे. ८ जून नंतर हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात २२ जूनपर्यंत पसरेल. जूनच्या शेवटच्या आठवडड्यामध्ये सर्वांच्या पेरण्या होतील आणि पेरणी करायची राहिली तर त्यांची पेरणी १० जुलै ते १५ जुलैपर्यंत होईन जाईल. अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, पैठण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बार्शी, बीड, पुणे या भागात खूप पाऊस पडणार आहे. इथून मागे जेवढा पाऊस या भागात पडलेला नाही, असा पाऊस या वर्षी या भागात पडणार आहे.
If you have any doubt, then contact me