". तुकाराम मुंढे यांची महिन्याभरातच पुन्हा बदली

तुकाराम मुंढे यांची महिन्याभरातच पुन्हा बदली

माझा महाराष्ट्र
0
माझा महाराष्ट्र : 
आपल्या कठोर निर्णयांमुळं आणि शिस्तीमुळे कायम चर्चेत असलेले अधिकारी तुकाराम मुंढे Tukaram Mundhe यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यांच्यासह इतर २० अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत . शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवार २ जानेवारी २०२३ रोजी या बदल्यांचा आदेश काढला. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग ते साखर आयुक्तांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तुकाराम मुढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षात तुकाराम मुढे यांची २० वेळा बदली झाली आहे. त्यांच्याकडं कृषी व पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महिन्याभरातच त्यांची बदली करण्यात आली आहे. 

बदली झालेले इतर अधिकारी

- चंद्रकांत पुलकुंडवार- साखर आयुक्त, पुणे

- डॉ. सुधाकर शिंदे - अतिरिक्त महापालिका आयुक्त , मुंबई

- सुजाता सौनिक - अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग

- लोकेश चंद्र - अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण

- एस वी आर श्रीनिवास - विशेष कर्तव्य अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

- राधिका रस्तोगी - मुख्य सचिव आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय

- संजीव जयस्वाल - उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

- आय ए कुंदन - मुख्य सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय

- आशीष शर्मा - प्रधान सचिव (2), नगरविकास विभाग, मंत्रालय

- विजय सिंघल - महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई

- अंशु सिन्हा - सचिव, OBS बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय

- अनुप यादव - सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय

- डॉ. अमित सैनी - मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन

- डॉ. माणिक गुरसाल - मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड

- कादंबरी बलकवडे - महासंचालक, MEDA, पुणे

- प्रदीपकुमार डांगे - संचालक, रेशीम उद्योग, नागपूर

- शंतनू गोयल - सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई

- पृथ्वीराज बी. पी. - संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई

- डॉ. हेमंत वसेकर - आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

अशी बदली झालेल्यांची नावे आहेत .


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)