दहावी, बारावीच्या निकालात पैकीच्या पैकी मार्क पडतात, परंतु सर्व विषयांत ३५ मार्क मिळवून अशा प्रकारे काठावर पास होण्याचा प्रकार म्हणजे विरळातील विरळ म्हणावा लागेल. ही किमया साधली आहे, ३५ टक्के मिळविणाऱ्या विशाल कराड vishal karad या विद्यार्थ्याने.
ठाण्याच्या Thane उथळसर परिसरात एका चाळीत १० बाय १०च्या खोलीत कराड कुटुंब राहाते. या कुटुंबातील विशाल कराड हा मुलगा शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात शिकतो. वडील अशोक कराड रिक्षा चालवतात व आई अपंग आहेत; मात्र त्या धुणी भांडी करून घराला हातभार लावतात. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे.
तुकाराम मुंढे यांची महिन्याभरातच पुन्हा बदली
विशाल याला दहावीच्या निकालात सर्व विषयांत ३५ मार्क मिळाले असून शब्दश: काठावर पास झाला आहे.
विशाल काठावर पास झाला असला, तरी भविष्यात मेहनत करून मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं त्याचं स्वप्न आहे. या निकालाबाबत त्याच्या आई- वडिलांना विचारले असता, आम्ही या निकालावर समाधानी असून तो पास झाला यातच आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पुढेही विशालच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे विशालच्या वडिलांनी सांगितले.
विशालच्या या ३५ टक्क्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. समाज माध्यमांवर त्याचे त्याच्या आई-वडिलांनी केलेले कौतूक, त्याला भरविलेला पेढा या गोष्टींचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क मिळवून चर्चेत येतात, मात्र विशाल प्रत्येक विषयात ३५ मार्क पाडून चर्चेत आला आहे. याबाबत त्याला विचारले असता, दहावीच्या परीक्षेत पास होईल, असे वाटले नव्हते, असे तो सांगतो. माझ्या आई- वडिलांमुळे ही परीक्षा पास झालो, असे त्याने सांगितले. आता पुढे मला शिक्षण घ्यायचे असून पुढे मला इंजिनिअर किंवा कलेक्टर व्हायचे असून घरची परिस्थिती सुधारायची असल्याचेही त्याने सांगितले.
If you have any doubt, then contact me