". इंटेलिजन्स ब्युयरोमध्ये 797 पदांची भरती : पगार तब्बल 81 हजार

इंटेलिजन्स ब्युयरोमध्ये 797 पदांची भरती : पगार तब्बल 81 हजार

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र : (इंटेलिजन्स ब्युयरोमध्ये 797 पदांची भरती : पगार तब्बल 81 हजार)
नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये Intelligence Bureau निष्ठ गुप्तचर अधिकारी या पदासाठी तब्बल 797 जागांची भरती Recruitment केली जाणार आहे. 

सर्वांनाच सरकारी नोकरी हवी असते. त्यासाठी सर्व तरूण सरकारी नोकरीच्या जाहिरातीची चातकाप्रमाणे वाट पाहात असतात. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

कुठे करायचा अर्ज?


ज्या तरुणांना या पदासाठी अर्ज करायचे आहे, त्यांनी अधिकृत वेबसाईट  mha.gov.in वर जाऊन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 31 मेपासून सुरू झाली असून नलाईन अर्ज करण्याची शेवटची तारक्षख 23 जून 2023 ही आहे. या भरतीत 797 पदांची भरती केली जाणार आहे. 

शैक्षणिक अट काय ?


अर्ज करणाºया उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार किंवा संगणक विज्ञान यासारख्या क्षेत्रातील डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, भौतिकशास्त्र, गणित यांसारख्या विषयांत पदवी घेतलेली असावी. 

या पदांसाठी वयोमर्यादा किती ?


नियमानुसार एस.टी., एस.टी. आणि ओ.बी.सी. उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथील आहे. अर्ज करणाºया उमेदवाराचे वय 18 ते 27 दरम्यान असावं, अशी अट ठेवलेली आहे. 

जागांचा तपशील


आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी म्हणजेच इ.डब्ल्यू.एस.साठी 79 पदं राखीव आहेत, तर ओ.बी.सी. साठी 215 पदं आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जातींसाठी 119 तर अनुसूचित जमातींसाठी 59 पदं आहेत. इतर सर्वांसाठी म्हणजेच आरक्षण नसलेली ओपन 325 पदे आहेत. 

थोडेसे तारखांबद्दल


अर्ज नलाईन करायचा असून 3 जून रोजी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, 23 जून
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख आहे, 27 जून 


IB Recruitment 2023 Apply Online

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)