माझा महाराष्ट्र :
एका मोबाइलवर दोन बीयर फ्री , अशी ऑफर एका दुकानदाराने दिली ; परंतु गर्दी झाल्याने यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने ही जाहिरात दुकानदाराच्या चांगलीच अंगलट आली.
उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यातील ही घटना आहे. एका दुकानदारानं होळीनिमित्त खास योजना जाहीर केली. एक मोबाईल घ्या अन् दोन बीयर मोफत न्या. ही जाहिरात दुकानदाराने व्हायरल केली. होळी बंपर धमाका असं नाव त्यानं ऑफरला दिलं.
जाहिरात पाहून दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली. गर्दी जास्त झाल्याने ही माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. पोलिसांनी खातरजमा करून या दुकानदाराला तब्यात घेतले. होळीच्या दिवशी शांततेचा भंग होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. आता या प्रकरणी दुकानदार राजेश मौर्य याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.
If you have any doubt, then contact me