". आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा : अधिकाऱ्यावर उगारला होता हात

आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा : अधिकाऱ्यावर उगारला होता हात

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना अधिकाऱ्यावर हात उभारल्याच्या आरोपावरून दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वरच्या कोर्टात अपील करेपर्यंत त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

व्हीप म्हणजे काय? येथे जाणून घ्या

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याची माजी मंत्री बच्चू कडू यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नुकतीच एका प्रकरणात त्यांना धाराशिव येथील न्यायालयाने कोर्ट संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली होती. 2017 मध्ये दिव्यांगांच्या मागणीसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन सुरू होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. यादरम्यान महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याबरोबर त्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत कृष्णा व कडू दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीत कृष्णा यांच्यावर कडू यांनी हात उगारला, असा कडू यांच्यावर आरोप होता. 

‘ए बस खाली’ म्हणत मुख्यमंत्र्यांनी लगावला या ठाकरेंना टोला

दिनांक 24 जुलै 2017 रोजी ही घटना घडली होती. यावेळी बच्चू कडू आयुक्त कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले . त्यांनी आयुक्तांना शिवीगाळही केली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मध्ये पडून कडू यांना अडवले होते. त्यानंतर पोलीस संरक्षणात आयुक्त कृष्णा यांना बैठकीच्या स्थळावरून बाहेर नेले होते . नाशिक महानगरपालिकेने दिव्यांगांसाठीचा तीन टक्के राखीव निधी खर्च करावा, अशी मागणी कडू यांच्यासह आंदोलकांची होती. 

‘‘जो मध्ये येईल त्याला जेसीबीखाली घाल बिनधास्त’’ : सरकारी अधिकाऱ्याची मुजोरी

अधिकारी शासन निर्णयाचे पालन करत नसल्याचा आरोप कडू यांनी केला होता. आयुक्त कृष्णा यांनी याबाबत अपंग कल्याण विभागाच्या सचिवांचा सल्ला मागितला असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु यात अपंग कल्याण खात्याच्या सचिवांच्या सल्ल्याची काहीही गरज नसल्याच्या मतावर कडू ठाम होते. अधिकाऱ्यांनी केवळ शासन निर्णयाचे पालन करावे, अशी कडू यांची अपेक्षा होती. याच मुद्द्यावर दोघांमध्ये वाद झाले होते.

‘बच्चु कडू तुम्ही गद्दार आहात’ : आ. कडुंची गाडी अडवून वृद्धाचा आरोप

या प्रकरणानंतर बच्चू कडू यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्ह्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. यात बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आले. कडू यांना न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावणी आहे.

पुतण्याच्या लग्नात काकाने पाडला पैशांचा पाऊस

सरकारी अधिकारी आणि बच्चू कडू यांचं कधीच पटत नाही. अधिकाऱ्यांवर हात उचलल्याचा आरोप अनेक वेळा बच्चू कडू यांच्यावर झाला आहे. याआधी काही प्रकरणात त्यांना दोषीही ठरवण्यात आले आहे. काही प्रकरणात कमी अधिक प्रमाणात त्यांना शिक्षाही ठरवण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा नाशिकच्या न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे कडू अडचणीत आले आहेत. त्यांच्या या आक्रमक कार्यपद्धतीमुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी त्यांना बिचकून असतात. मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डोक्यात चापट्या मारल्याचाही कडू यांच्यावर आरोप होता.

चॅट जीपीटी'ला साधं समजू नका : वसूल करून दिले 90 लाख

शिक्षा सुनावल्यानंतर कडू यांनी माध्यमांशी संवाद . यावेळी त्यांनी , की दोन दोन तीन तीन वर्ष नाशिकचे आयुक्त अपंगांचा निधी खर्च करत नव्हते. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. आयुक्तांना मी दोन वेळा पत्र लिहिले; परंतु आयुक्तांनी आमदाराच्या पत्राला साधं उत्तर दिलं नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागले. ज्या कारणासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं ते कारण विचारात घेणं गरजेचं होतं. 153 कलमाचा गैरवापर होत आहे. या कलमात दुरुस्तीची काय गरज होती? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे .

या गावातील शेतकर्‍यांनी गावच काढले विकायला : यामुळे घेतला टोकाचा निर्णय

बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पंधरा हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे . सरकार वाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता .

Realme घेऊन येत आहे 'मिनी कॅप्सूल' स्मार्ट फोन C55

ओमप्रकाश बाबाराव कडू ऊर्फ बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले आहेत. प्रहारच्या माध्यमातून शेतकरी युवक दिव्यांगांचे संघटन करून त्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. आपल्या अभिनव आंदोलन करण्याच्या पद्धतीमुळे ते कायम चर्चेत असतात. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते . 

शेतात काम करणाऱ्या आईला भेटायला आला डीएसपी लेक : दोघांमधील संवाद झाला व्हायरल

सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांचे हप्ते थकल्याने जिल्हा सहकारी बँकेने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केल्याच्या प्रकरणात बच्चू कडू यांनी बँकेत सुतळी ॲटमबॉम्ब फोडून अभिनव आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश मिळाल्याने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर त्यांना परत मिळाले होते. या घटनेने त्यांचे नेतृत्व पुढे आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)