". विमानतळावर गोंधळ घालने तरुणीला पडले महागात

विमानतळावर गोंधळ घालने तरुणीला पडले महागात

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

विमानतळावर गोंधळ घालून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे व  महिला अधिकाऱ्याच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेणे, एका तरुणीला चांगलेच महागात पडले. या तरुणीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'समृद्धी'वर वेगाशी स्पर्धा घेतेय अनेकांचा जीव : बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात सहा ठार

पुणे येथील लोहगाव विमानतळावर हा प्रकार घडला. गुंजन राजेशकुमार अग्रवाल असे या पश्चिम बंगालमधील हावडा येथे राहणाऱ्या 24 वर्षे वयाच्या तरुणीचे नाव आहे. गुंजन ही प्रवासी टॅक्सीतून लोहगाव विमानतळावर आली होती. आल्यानंतर गाडी भाड्यावरून तिचा टॅक्सी चालकाशी वाद झाला. यावेळी टॅक्सी चालकांनी लोहगाव विमानतळ प्राधिकरणाकडे मदत मागितली. त्यानंतर विमानतळावरील व्यवस्थापक भक्ती लुल्ला या येथे गेल्या. हा प्रकार विमानतळाच्या एक नंबरच्या प्रवेशद्वारावर सुरू होता. 

या आमदाराने वाटल्या सात हजार सायकली आणि बरंच काही : शरद पवारांनी केले कौतूक

वाद सुरु असल्याचे समजताच व्यवस्थापक भक्ती लुल्ला तेथे गेल्या , तेव्हा गुंजन विमानतळाच्या आवारात टॅक्सीचालकाशी वाद घालून गोंधळ घालीत होती. या प्रकाराने विमानतळाच्या प्रवेशद्वारात रांगेत थांबलेला प्रवाशांना त्रास होत होता. त्यामुळे भक्ती लुल्ला यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी लुल्ला यांच्यासोबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक रूपाली ठोके याही होत्या. दोघींनीही गुंजनला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु गुंजन हिने काहीही ऐकून न घेता उलट निरीक्षक ठोके आणि व्यवस्थापक लुल्ला यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर वादाचे पर्यावसन धक्काबुकीत झाले. धक्काबुक्की करूनही गुंजन थांबली नाही , तर तिने लुल्ला यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. त्यानंतर मात्र गुंजन हिला ताब्यात घेण्यात आले. 

रस्त्यावर पायी कोणत्या बाजुने चालावे? : येथे जाणून घेऊ

याप्रकरणी गुंजनच्या विरोधात पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या बाहेर राडा घालणे या तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)