". एसटीने नवऱ्याला रजा दिली नाही : कर्मचाऱ्याच्या पत्नीचे डेपोत झोपून आंदोलन

एसटीने नवऱ्याला रजा दिली नाही : कर्मचाऱ्याच्या पत्नीचे डेपोत झोपून आंदोलन

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :
एसटी महामंडळात चालक म्हणून काम करत असलेल्या विलास कदम यांनी रजेसाठी रितसर अर्ज केला होता; परंतु प्रशासनाने तो मंजूर केला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी एसटीच्या डेपोच्या कार्यालयासमोर चक्क झोपून आंदोलन केले. या आंदोलनाचा परिणाम होऊन कदम यांना रजा मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची 270 दिवसांची रजा शिल्लक आहे. याप्रकरणात नलिनी कदम यांच्या विरोधात आगाराकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे.


सांगली जिल्ह्यातील आटपाडी एसटी डेपोमध्ये हा प्रकार घडला. त्याचे झाले असे, की आटपाडी डेपोत कदम हे चालक म्हणून नियुक्तीस आहेत. ते एसटी महामंडळात चालक म्हणून गेल्या 33 वर्षांपासून सेवा देत आहेत. आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांची रजा त्यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी डेपोत रितसर अर्जही केला होता. मात्र प्रशासनाने त्यांना सुटी नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांच्या पत्नीने आगारप्रमुखांच्या केबिनसमोर अंथरून टाकून आंदोलन सुरू केलं. या अनोख्या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. वरीष्ठांना याबाबत कळविण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन सांगलीच्या विभागीय कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आटपाडी आगारात धाव घेतली. तेथे येऊन त्यांनी आंदोलक महिलेची भेट घेतली व प्रकाराची माहिती घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांकडेही त्यांनी चौकशी केली.


या आंदोलनाचा अपेक्षीत परिणाम होऊन कदम यांची रजा आगारप्रमुखांनी तातडीने मंजूर केली. रजा मंजूर केल्यानंतर कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर त्या आपल्या घरी निघून गेल्या. कदम यांची 33 वर्षे सेवा झाली आहे, येत्या काही दिवसांत ते सेवानिवृत्त होत आहेत, तसेच त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे, तरीही त्यांना रजा मिळत नाही, त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)