आपण जे केलंय ते नियमानं केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, की सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्याचं महाराष्ट्राचं सरकार खुद्दारांचं आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेलं सरकार गद्दारांचं होतं. महाविकास आघाडीचे नेते रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना रोज सांगितलं जातं, की हे सरकार अपात्र ठरणार आहे. 'सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत,' हा संदेश आपल्यासाठी नाही, जे उरले सुरले आहेत, त्यांच्यासाठी आहे, असा टोला फडणवीस यांनी लावला.
यानंतर ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले, की ''निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे काय? १) देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्याच बाजुने लागेल, २) केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांना ब्रेकींग न्यूज देत सांगतात, शिवसेनेचे चिन्ह जाईल, ते शिंदे यांनाच मिळेल. नो कॉमेंट्स.''


निव्वळ हरामखोर पना
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवातुम्ही किती नीच आहात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.
उत्तर द्याहटवा