राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता. राज्यपाल असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी व्हायला हवी, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. वर्धा येथे एका कार्यक्रमानिमित्त पवार यांचे बुटीबोरी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे संविधानिक पदावर होते. या पदावर असताना त्यांनी जे निर्णय घेतले, त्याची चौकशी व्हायला हवी.
कोश्यारी हे कायम वेगवेगळ्या निर्णयांमुळे वादग्रस्त राहिले आहेत. त्यांना हटविण्यासाठी महाराष्ट्रात मोठी आंदोलने झाली. तसेच वेळोवेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधातही राज्यभरात आंदोलने झाली. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु तो बरेच दिवस मंजूर करण्यात आला नव्हता. आता तो मंजूर करण्यात आल्यानंतर पवार यांनी व्यक्त केलेल्या मताला महत्व आले आहे. कोश्यारी यांनी संविधानाच्या विरोधात काही केले असेल, तर त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.
कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबत लवकर निर्णय व्हायला हवा होता. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली, पण केंद्राने निर्णय घेतला, ही चांगली बाब झाली आहे, असे पवार म्हणाले.


If you have any doubt, then contact me