माझा महाराष्ट्र : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांची जीभ पुन्हा घसरली आहे. शरद पवार Sharad Pawar, संजय राऊत Sanjay Raut या फाटक्या, जीर्ण आणि चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सरकार फुल स्ट्रॉंग आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी धुळ्यामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. 'राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती पवारांनी घाण आणि नीच राजकारण केले', असा आरोप यावेळी पडळकर यांनी केला.
आदिवासी जमातीसह 33 जमातींवर अन्याय करायला पवारांनी काही लोकं जवळ ठेवले होते आणि ते आदिवासी जमातीचेच होते. धनगर समाजाला आरक्षणास विरोध करणारे लोकदेखील पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एक आहे, म्हणून मी दरवेळेस पवारांवर बोलतो , असे पडळकर म्हणाले.
भाजपला दिला घरचा आहेर
आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौडबंगाल करत असल्याचा घणाघाती आरोप करत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर निशाणा साधत भाजपलाच घरचा आहेर दिला.
If you have any doubt, then contact me