माझा महाराष्ट्र : दारू पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही म्हणून एकाने आपल्या पत्नीला ठार केल्याची घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी येथे ही खुनाची घटना घडली. लोखंडी रॉड डोक्यात मारून बायकोची हत्या केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की लालू मोरे याच्या सोबत पत्नीसह मुलगा आणि सून राहत होते. लालू मोरे हा पत्नी हिराबाई मोरे यांच्याकडे पन्नास रुपये मागत होता. लालू आधीच दारू पिलेला असल्याने पत्नी हिराबाई यांनी पैसे देण्यात नकार दिला. लालू मोरे याला राग आल्याने तो घरून बाहेर निघून गेला. नंतर हिराबाई या घरात आणि मुलगा आणि सून बाहेर पडवीत झोपून गेले होते. सर्व झोपल्यावर रात्री उशिरा लालू मोरे याने घरात आल्यावर दरवाजा लावून घेत मुसळ म्हणून वापरत असलेला लोखंडी रॉड पत्नीच्या डोक्यात मारला.
तोंडावर आणि डोक्यात रॉड मारल्याने हिराबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यावेळी आवाज आल्याने मुलगा आणि सून यांनी दरवाजा वाजविला त्यानंतर काही वेळाने वडीलांनी दरवाजा उघडला. 'तुझ्या आईला मी मारून टाकले आहे काय करायचे करून घे' म्हणत तिथून लालू मोरे निघून गेला. त्यानंतर मुलगा राकेश याने लागलीच रुग्णवाहिका बोलावून घेतली, त्यांनी तपासून आई मृत घोषित केले.
मुलगा राकेश यांनी पोलिसांना बोलावून याबाबत माहिती दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.jpeg)
If you have any doubt, then contact me