माझा महाराष्ट्र : गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधर उमेदवारांचे नुकसान होत असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत २५ जानेवारी २०२३ पासून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांनी 2021 सालच्या महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेच्या निकालाला, मुलाखतीला व 2022 च्या महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती मिळावी. मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करावे , राज्यासाठी स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे, यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.


If you have any doubt, then contact me