माझा महाराष्ट्र :
वादग्रस्त आयएएस ऑफिसर पूजा खेडकर यांच्याबाबत एक मोठी बातमी आली आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांना आता पुन्हा परीक्षेत बसण्यास परवानगी नाकारली आहे. यूपीएससीच्या समितीने केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
यूपीएससीने नेमकं काय म्हटलंय?
१८ जुलै २०२४ रोजी परवानगी असलेल्या प्रयत्नांपेक्षा जास्त प्रयत्न करण्याच्या आरोपाबाबत पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना २५ जुलै २०२४ पर्यंत एससीएनचे उत्तर सादर करण्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी उत्तर सादर करण्यासाठी ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची विनंती केली.
दोन-तीन दिवसांत पर्दाफाश करणार : जरांगे
त्यानंतर यूपीएससीने त्यांना उत्तर सादर करण्यासाठी ३० जुलै २०२४ च्या संध्याकाळी ३:३० पर्यंत मुदत वाढवून दिली. मात्र त्यांना दिलेल्या मुदत वाढीच्या कालावधीतही त्या अपयशी ठरल्या.
कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?
या दरम्यान यूपीएससीने उपलब्ध कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि खेडकर यांनी नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले.
विम्यावरील जीएसटी रद्द करा : केंद्रीय मंत्री गडकरी यांची मागणी
पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या एकट्या प्रकरणात, यूपीएससीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिड्युर (एसओपी) त्यांच्या प्रयत्नांची संख्या मुख्यत्वे त्यांनी नाव आणि पालकांचे नाव बदलल्यामुळे शोधू शकली नाही. अशा प्रकारचे प्रकरण पुन्हा घडू नये यासाठी यूपीएससी यापुढे काळजी घेणार आहे .
पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला
जातीच्या दाखल्यांची यूपीएससी केवळ प्राथमिक छाननी करते. सक्षम अधिकाऱ्याने जर जातीचा दाखला दिला असेल तर तो खरा मानला जातो , असे यूपीएससीने म्हटले आहे .
If you have any doubt, then contact me