". उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय? : फडणवीस बोलले आणि शिंदे हसले

उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय? : फडणवीस बोलले आणि शिंदे हसले

माझा महाराष्ट्र
0


 

माझा महाराष्ट्र :

येत्या २८ मे २०२३ रोज नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न होता, ते राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले आहे. या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले, 'उद्ध्व ठाकरे तसेही विधानपरीषदेत जाऊन बसत नाही, त्यांना संसदेत कोण घेऊन जातंय?' यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान हलवत 'बरं' म्हणत फडणवीसांच्या उत्तराला हसत हसत दाद दिली.


नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची तरीख जसजशी जवळ येत आहे, तसे या विषयावर वातावरण तापू लागले आहे. २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्ध्व ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. यावरून फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला आहे.


काय म्हणाले फडणवीस?

लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचे असे कावीळ झाल्यासारखे वागणे अत्यंत अयोग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे, तेच लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनाला जात नाहीत. ते जी कारणे सांगत आहेत, ती अत्यंत हास्यास्पद आहेत. उद्ध्व ठाकरे विधानपरीषदेचे सदस्य आहेत. तेथे ते दोन तासही जाऊन बसत नाहीत, मग त्यांना लोकसभेत कोण बोलावणार आहे? नवीन संसद भवन ही देशाची शान आहे. ज्येवढ्या कमी वेळेत हे तयार झाले, त्यामुळे देशाची ताकद दिसत आहे. विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही वर्षानुवर्षे नवीन संसद भवन निर्माणाची चर्चा व्हायची. ते कुणी बनवू शकले नाही; मात्र मोदींनी ते बनवून दाखवले. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. विरोधी पक्षाच्या निर्णयावरून त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसते, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)