". जरांगेंनी केवळ मराठा आरक्षणावर लक्ष द्यावे : ना. विखे

जरांगेंनी केवळ मराठा आरक्षणावर लक्ष द्यावे : ना. विखे

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र 

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मराठा आरक्षणावर लक्ष द्यावे, विनाकारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. 

हे वाचा👉तेहतीस एकरांवर नुसता कांदा : बीडच्या शेतकऱ्याची कमाल

मंत्री विखे यांनी पुढे म्हटले, की जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढ्याचा इतिहास समजून घ्यायला हवा. फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी न्यायालयात आरक्षण टिकवलं. त्यामुळे त्यांना याचे श्रेय दिले गेले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी महायुती सरकारने पुढाकार घेतलेला आहे. 

हे वाचा👉विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?

केवळ टीका करून आरक्षण मिळणार नाही. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार मुख्यमंत्री होते, काँग्रेसचीही अनेक वर्षे सत्ता होती, याबाबत मात्र कुणी काही बोलायला तयार नाही. जरांगे पाटील यांनी गोलमेज परिषद घ्यावी, त्या काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांना बोलवावे, म्हणजे सत्य परिस्थिती समोर येईल. 

हे वाचा👉कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?

आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो कोणीही नाकारू शकत नाही, मात्र आंदोलनाच्या आडून फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे काम करू नये. फडणवीस यांची भूमिका कायम प्रामाणिक राहिली आहे, ती आजही प्रामाणिक आहे आणि उद्याही राहील, असे ते म्हणाले.

हे वाचा👉येथे पहा राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)