". मनोज जरांगे व नारायण राणे यांच्यातील वाद पेटला

मनोज जरांगे व नारायण राणे यांच्यातील वाद पेटला

माझा महाराष्ट्र
0



माझा महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange व भाजपचे नेते नारायण राणे Narayan Rane यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर जोरदार टीका केली, त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आपण मराठवाड्यात Marathwada येऊन सभा घेणार असल्याचं चॅलेंज दिलं होतं, त्यानंतर जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर खोचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उत्तर-प्रत्युत्तराचा सिलसिला जोरदार सुरू झाला आहे.

हे वाचा👉तेहतीस एकरांवर नुसता कांदा : बीडच्या शेतकऱ्याची कमाल

मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांच्या राज्यभर ठिकठिकाणी यात्रा सुरू आहेत. या दरम्यान जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या बाजुने आता एक एक नेता पुढे येताना दिसत आहे. त्या नारायण राणेही आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

हे वाचा👉जरांगेंनी केवळ मराठा आरक्षणावर लक्ष द्यावे : ना. विखे

जरांगे पाटील यांनी म्हटले होते, की मराठ्यांनी २०२४ मध्ये कुठे बसायचे ते ठरवायचे. माझ्या विरोधात टोळ्या उतरवण्यात आल्या आहेत. कोकणातील एक जण सध्या भिताडाकडे बगत आहे. हे अग्या मोहळ कुठं कुठं चावंल. मी कधीच म्हणालो नाही, तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, तु मराठवाड्यात आला, तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो, असा टोला जरांगे यांनी राणे यांना लगावला होता.

हे वाचा👉कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?

जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका सुरू केल्यामुळे फडणवीस यांच्या बाजुने नारायण राणे मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांचं घर असलेल्या मराठवाड्यात येऊन आपण सभा घेणार असल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात आला तरी काही पाहू शकत नाही, कारण मी कपडे घालतो, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरही राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचा👉येथे पहा राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

जरांगेने कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखं काय आहे? आतापर्यंत ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, पण ते छत्रपती झाले का? बदल गुणात्मक व्हायला पाहिजे, अशा शब्दलत राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

हे वाचा👉विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?

 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)