माझा महाराष्ट्र :
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विम्याचे संरक्षण कवच पोहोचावे यासाठी लोककल्याणकारी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे संकेत आहेत . या अगोदर यासाठी अनेक सरकारांनी विम्यावरील कर माफ करण्यासारखे निर्णय वेळोवेळी घेतलेले आहेत . परंतु जीएसटी आल्यापासून विम्यावरही 18% जीएसटी लावला जात आहे . परिणामी विमा महाग झाला असून सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेला आहे . या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याच सरकारला पत्र लिहून विम्यावरील जीएसटी माफ करण्यातचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे .
आता नितीन गडकरी यांनी आपल्याच सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर लावण्यात आलेले 18 टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांना नागपूर मंडळातील जीवन विमा निगम कर्मचारी संघाने यासंदर्भात त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर गडकरी यांनी हे पत्र लिहिले आहे.
गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी विमा प्रीमियमवर कर आकारु नये. तसेच वैद्यकीय विमा प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी सामाजिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या या क्षेत्राच्या विकासात अडथळा ठरत आहे. जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी भरणे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आव्हानात्मक आहे. यामुळे जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी मागे घेण्याच्या सूचनेचा प्राधान्याने विचार करावा.
If you have any doubt, then contact me