माझा महाराष्ट्र
आमदार प्रवीण दरेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून 12 संघटना जमा केल्या, असा आरोप जरंगे यांनी केला. मराठ्यांचा विरोधात उगाच बोंबलायचं असं त्यांना सांगितलं असं म्हणत जरांगे यांनी दरेकरांवर निशाणा साधला. पुढचे दोन-तीन दिवस थांबा सगळा पर्दा फाश होईल असेही ते म्हणाले.
मराठ्यांची एकजूट चळवळ बदनाम केली जात आहे. काही जणांचे दुकान बंद झाले तरी वर्ष वर्ष त्यांना झोप येत नाही. त्यांना दरेकरांच्या माध्यमातून संधी सापडली असं म्हणत आपण उगाच इकडून तिकडं पळून फडणवीस यांचे स्वप्न साकार करायचं हे काम करायचं नाही. अशी सणसणीत टीका जरांगे यांनी केली.
दरेकर फडणवीस तुम्हाला वाचवणार नाहीत
दरेकर फडणवीस तुम्हाला वाचवणार नाही . आपण त्यांच्या दारात कशाला जायचं ? सरकारचे नोकर आहात का ? असा सवाल करत दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस यांनी रचलेला हा डाव आहे. मराठा समाज जाब विचारायला खंबीर आहे. अजून मुंबईला जायचं आहे. तुम्ही उगाच दरेकर आणि फडणवीस यांचे ऐकून यात पडू नका , असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
दरेकरांसोबत आणखी बरेच लोक जाणार आहेत. दरेकरांना सामील होणाऱ्या मराठा बांधवांना यांनीच बदनाम केलं आहे. यांना चर्चेला बोलवायचं, दार लावून घ्यायचे आणि यांनीच व्हिडिओ तयार करायचे. बंद दाराआड चर्चा सुरू आहे असं सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. हा सगळा फडणवीसांचा डाव आहे.
दरेकर आणि फडणवीस आरक्षण मिळू देणार नाहीत हे मराठ्यांना हे कळलं आहे. त्यामुळेच मराठ्यांनी त्यांचं राजकीय करियर संपवायचं काम हातात घेतलं आहे. दरेकर आणि फडणवीसांसाठी तुम्हाला समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे .
If you have any doubt, then contact me