माझा महाराष्ट्र न्यूज डेस्क
माझ्या नावापुढे उपमुख्यमंत्रीपदाचे रेकॉर्ड आहे, असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
अजितदादा पवार हे अनेकदा उपमुख्यमंत्री झाले. आताही भाजपसोबत गेल्यानंतर त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशा पद्धतीने अजितदादा अनेकदा उपमुख्यमंत्री झाले. परंतु मुख्यमंत्री त्यांना होता आले नाही. मात्र आता तीच अट त्यांनी भाजपसमोर ठेवली असल्याची चर्चा आहे.
द
अजितदादा भाजपबरोबर आले, तर नक्कीच काही तरी अटी-शर्तींवर आले असतील. त्यांनी अनेकदा मला मुख्यमंत्री व्हायचंय, अशी इच्छा बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरच अजितदादा भाजपला साथ देत आहेत, अशी चर्चा वरीष्ठ पातळीवर सुरू आहे. आणि आता ११ ऑगस्ट रोजी अजितदादांची इच्छा पूर्ण होणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पोर्टलवरून देण्यात आली आहे. त्यांनी म्हटलंय, की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर शिंदेंना राजिनामा देण्याचे सांगण्यात येईल. ज्यामुळे हे मंत्रीमंडळ बरखास्त होईल व नवीन मंत्रीमंडळ नेमण्यात येईल.
अजितदादा पवार हे कायमच भाजपसाठी महत्वाचे नेते राहिले आहेत. त्यांनी भाजपमध्या यावं, ही भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची कायमच इच्छा राहिली आहे. त्यामुळे हे वरीष्ठ नेते अजितदादांच्या कायमच संपर्कात राहिले आहेत. परंतु मागच्या वेळी अजितदादांना मुख्यमंत्री बनविण्याची अट मान्य न झाल्यामुळे चर्चा फिस्कटली होती. आता मात्र अजितदादांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
If you have any doubt, then contact me