माझा महाराष्ट्र
दारुच्या नशेत माणूस खरे बोलतात, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय नुकताच एके ठिकाणी आला. दारुच्या नशेत फुशारकी मारणे एका व्यक्तीला चांगलेच अडचणीचे ठरले. 30 वर्षांपूर्वीच्या खुनाबद्दल तो बोलला आणि खुनाचा उलगडा झाला.
तीस वर्षे लपवून ठेवलेली माहिती दारुच्या नशेत फुशारकी मारताना उघड करणे एका आरोपीला चांगलेच भोवले. या फुशारकीमुळे लोणावळ्यात झालेल्या खुनाचा उलगडा झाला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अविनाश पवार हा मूळचा लोेणावळ्याचाच आहे. त्याने 1993 सालच्या आॅक्टोबरमध्ये दोन मित्रांसोबत चोारी करताना धनराज कुरवा व त्यांच्या पत्नी धनलक्ष्मी कुरवा या वृद्ध जोडप्याला ठार मारले होते. या प्रकरणातील अमोल काळे व विजय देसाई या दोघांना त्याच वेळी अटक करण्यात आली होती; परंतु अविनाश पवार हा फरार होता.
खून केल्यानंतर अविनाश पवार हा लोणावळा सोडून दिल्ली येथे पळून गेला होता. काही वर्षांनंतर तो परत आला व छत्रपती संभाजनगर येथे राहात होता. येथे त्याने त्याचे नाव अमित पवार असे ठेवले व त्या नावाने सरकारी कागदपत्रेही तयार केली होती. त्यानंतर तो पिंपरी चिंचवडला व नंतर नगर येथे स्थायिक झाला. तेथूनही तो मुंबईतील विक्रोळी येथे आला. तेथे त्याने आधार कार्डही बनवले होते. तेथे त्याने लग्नही केले.
तुळजाभवानीच्या दानपेटीत सापडले इतके हिरे : सोने मोजायचे काम अजूही सुरूच
यादरम्यान अगदी आईला भेटण्यासाठी देखील तो लोणावळ्याला गेला नाही. काही दिवसांपूर्वी एका पार्टी दारू पित असताना फुशारकी मारताना त्याने हा खून केल्याची कबुली दिली. ही खबर पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना त्यांच्या खबºयाने ही माहिती दिली. त्यानंतर विनाश पवार याला विक्रोळी येथून ताब्यात घेण्यात आले व त्याला अटक करण्यात आली. या प्रकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
If you have any doubt, then contact me