मान्सूनला यायला उशिर झाल्यामुळे देशात उष्णता कायम आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेच्या फटक्याने 24 तासांत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहार राज्यातील शेखापूर येथे सर्वाधिक 44.2 डिग्री सेल्सीअस तर पाटणा येथे 43.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने याबाबत बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट व काही जिल्ह्यांमध्ये आॅरेंज अलर्ट जारी केला आहे. नऊ भागात रविवारपर्यंत पिवळा अलर्ट दिलेला आहे. रोहतास, भोजपूर, कैैमूर, औरंगाबाद, बक्सर, आणि अरवाल हे जिल्हे उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित जिल्हे आहेत. येथे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पाटणा, खगरीया, बेगुसराय, बांका, नलंदा, जमुई, लखीसराय या जिल्ह्यांसाठी आॅरेंज अलर्ट असून पूर्व चंपारण, भागलपूर, गया, जेहानाबाद आणि पूर्व चंपारणमध्ये पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भोजपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा जणांचा मृत्यू झाला असून रोहतासमध्ये दोन आणि नालंदा, गया, जमुई आणि पाटणा येथे प्रत्येकी एकाचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. पुढील 48 तासांत उष्णता कमी होऊन थोडा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोकांनी उन्हात जाण्याचे टाळावे, असे आवाहन हवामान विभाग आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाटणा जिल्ह्यात सर्व शाळा आणि अंगणवाडी 24 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Heat wave in Bihar: 12 dead

.jpg)
If you have any doubt, then contact me