". सोन्याची उच्चांकी उसळी : चांदीही महागली

सोन्याची उच्चांकी उसळी : चांदीही महागली

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :
बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सोने प्रत्येक १० ग्रॅमसाठी उच्चांकी ६० हजार ९७७ रुपयांवर पोहोचले असून चांदी ७४ हजारांच्या पार गेली आहे. इंडिया बुलियन अ‍ॅँड ज्वेलर्स असोसिएशनने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सोने १२६२ रुपये तर चांदी २८२२ रुपयांनी महाग झाली आहे. यापूर्वी ३१ मार्च रोजी सोने ५९ हजार ७५१ रुपयांवर जाऊन सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. आता सोन्याने ६१ हजारांवर जाऊन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

चांदीनेही ७४ हजार ओलांडले असून इंडिया बुलियन अ‍ॅँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार चांदीच्या दराची ही ३१ महिन्यांतली उच्चांकी किंमत आहे. सध्या चांदी प्रति किलो ७४ हजार ६१८ रुपयांना विकत आहे.

२४ कॅरेट सोने ६० हजार ९७७ रुपये झाले असून २३ कॅरेट सोने ६० हजार ७३३ रुप्यो, २२ कॅरेट सोने ५५ हजार ८५५, १८ कॅरेट सोन्याला ४५ हजार ७३३ रुप्यो मोजावे लागत आहेत.

१ एप्रिलपासून बदलले नियम
दि. १ एप्रिल २०२३ पासून सोन्याबाबत नवीन नियम लागू झाला आहे. या नियमानुसार हॉलमार्किंगशिवाय सोने विकता येणार नाही. ज्याप्रमाणा आधार कार्डला एक नंबर असतो, त्याप्रमाणे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सोन्याला दिलेला असतो. हा नंबर असलेले सोनेच विकले जाणार आहे. ही संख्या अल्फान्युमेरिक असणार आहे, म्हणजे अक्षर आणि अंकाचा यात समावेश असणार आहे. या क्रमांकावरून सोने किती कॅरेटचे आहे, हे समजणार आहे. सोन्याला ट्रेड मार्क देण्यासाठी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. जेवढे कॅरेट जास्त तेवढे सोने महाग. २४ कॅरेट सोने महाग असले, तरी त्याचा वापर दागिने तयार करण्यासाठी करता येत नाही. त्यासाठी सोन्यात इतर धातू घालावे लागतात.

दिवाळीत धातू वधारणार?
यंदाच्या दिवाळीपर्यंत सोने व चांदी दोन्ही धातू नवे विक्रम प्रस्थापित करतील, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. २०२० पासून होत असलेली सोन्याची भाववाढ अजूनही सुरूच आहे. शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याला हा भाव मिळत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)