जी-मेलचा आयडी प्रत्येकाकडे असेल, हे आपण गृहीतच धरलेलं असतं, इतकं आज जी-मेल लोकप्रिय आहे. आज या जी-मेलचा उपयोग पत्र पाठविण्यापुरताच राहिलेला नाही, तर या जी-मेलच्या सहाय्याने आपण अनेक वेबसाईट, ॲप, गेम्स यामध्ये लॉग ईन करू शकतो. यासह इतर अनेक उपयोग असलेल्या या जी-मेलच्या इतिहासाबद्दल आपण आज जाणून घेऊ या.
दि. १ एप्रिल २००४ या एप्रिल फुलच्या दिवशी जी-मेल सुरू झाले आणि सुरू झाला मेलींगच्या इतिहासातील सुवर्णकालीन टप्पा. या आधी ई-मेल आयडी असणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. जी-मेल हे गुगल या कंपनीचं असल्याने जगभरात जी मेलच्या लाँचिगबाबत प्रचंड उत्सुकता होती. त्या वेळच्या प्रस्थापित मेलींग कंपन्या याहू, रेडीफमेल , हॉटमेल यापेक्षा किती तरी अधिक स्टोरेज कपॅसिटी म्हणजे एक जीबी स्टोरेज कर्पसिटी जी-मेल देणार होतं. ही कपॅसिटी मायक्रोसॉफ्टच्या हॉटमेलच्या ५०० पटींपेक्षा जास्त होती. हे अनेकांना अशक्यप्राय वाटत होते; हा गुगलचा एक प्रॅँक असेल, असे सर्वांना वाटत होते; परंतु १ एप्रिल २००४ रोजी या सर्व गोष्टी गुगलने शक्य करून दाखवल्या आणि जी-मेल लॉँच केले. त्यानंतर मेलींगच्या दुनियेत क्रांती झाली.
जी-मेल सुरू झाले तेव्हा ही केवळ स्टोरेजसाठीच चांगली सेवा नव्हती, तर ती खऱ्या अर्थाने एक वेगवान मेलींग सेवा होती आणि तीही सर्वांसाठी मोफत. जसा काळ पुढे गेला, तसा जी-मेलच्या सेवांमध्ये अमुलाग्र बदल झाला. मात्र आजही जी-मेलला जगभरात कोणताही चांगला पर्याय नाही. मेलसाठी वापरली जाणारी जगातली सर्वोत्तम सेवा जी-मेल मानली जाते.
त्या काळी याहू व हॉटमेल या मेलींगच्या कंपन्या प्रसिद्ध होत्या. या कंपन्यांना वगळून मेलींगची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. अशा काळात जी-मेल सुरू करणे म्हणजे सोपे नव्हते. परंतु गुगलने ही सेवा लॉन्च केली आणि याहू व हॉटमेल यांसारख्या कंपन्यांचे दिवाळे निघाले. जी-मेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लॉन्च झाल्यापासून ते आजपर्यंत जी-मेल सर्वात लोकप्रिय सर्व्हिस राहिली आहे.
जास्त स्टोरेज, वेगवान सेवा, लोकप्रिय इंटरफेस, फास्ट सर्चिंग, भरपूर ऑप्शन्स, चॅटिंग आणि इतर अनेक वैशिष्ट्य असलेली जी-मेल ही एकमेव सेवा आहे. गुगलवर जसे आपण शब्द टाकून शोध घेतो, तशी सुविधा जी-मेलवर आहे. जी-मेलवर ई-मेल आयडीसारखेच मेलमधील शब्द टाकूनही मेल शोधू शकतो. जी-मेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना अधिक स्टोअरेज हवे आहे, त्यांना ते खरेदी करण्याची सोय आहे. ते १० जीबी ते ४०० जीबी पर्यंतची स्टोरेज कॅपॅसिटी लोक भाड्याने घेऊ शकतात. जी-मेलमध्ये साठवलेली माहिती सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. जी-मेलला आपण ५० एमबी पर्यंतची फाईल आपण ॲटॅच करू शकतो. यापेक्षा जास्त मोठी फाईल आपण गुगल ड्राईव्हच्या सहाय्याने पाठवू शकतो.
जी-मेल ही सुविधा गुगलने केवळ मेलींगपुरती पर्यादीत ठेवली नाही. या जी-मेलचा वापर पासवर्ड सेव्ह ठेवण्यासाठी होतोच; परंतु अनेक ॲप्स, वेबसाईट्स, गेमिंग ॲप आदींवर साईन अप व साईन ईन करण्यासाठी करता येतो. जास्त स्टोअरेज कपॅसिटीमुळे महात्वाचे ई-मेल आपल्याला कायम सुरक्षित ठेवता येतात आणि उत्तम सर्च इंजिनमुळे ते पटकन शोधताही येतात.
जी-मेल आज वेबसाईटपेक्षाही ॲपवर जास्त वापरले जाते. हे ॲप सर्व प्रकारच्या मोबाईल फोनवर वापरले जाऊ शकते. अनेक भाषांमध्येही आपण जी-मेल वापरला जातो. आज सवळपास प्रत्येक ई-मेल सेवा वापरणारा व्यक्ती जी-मेल वापरतो. आज जी-मेलची इतकी सवय झाली आहे, की जेव्हा जी-मेल थोड्या काळासाठी बंद पडते, तेव्हा जगभरात हडकंप माजतो व त्याच्या बातम्या होतात. काही हजार लोकांपासून सुरू झालेला जी-मेलचा प्रवास कोट्यवधी युजर्सपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या नवनवीन फीचर्ससह जी-मेल आपल्या सेवेत न थकता हजर आहे.
If you have any doubt, then contact me