". REALMEच्या या बेजेट फोनची भारतात विक्री सुरू

REALMEच्या या बेजेट फोनची भारतात विक्री सुरू

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

REALME या मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने आपला बजेट फोन REALME-C५५ हा भारतात लॉँच केला आहे. मंगळवारी (दि. २८ मार्च २०२३) पासून हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा- गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द : महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलने केली कारवाई

REALME-C५५ हा फोन बजेट फोन असला, तरी याचे फिचर्स जबरदस्त आहेत. या स्मार्टफोनचा ६.५२ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच त्यात फुल्ल एचडी, रिफ्रेश रेट आणि ६८० निट्स ब्राईटनेस असे जबरदस्त फीर्चर्स आहेत. फोनमधील मिनी कॅप्सूल फिचर सर्वांचे आकर्षण ठरले आहे. त्यामुळे नोटिफिकेशन टूल वापरताना जास्त फायदा होतो.

हेही वाचा- राजकीय पक्षांच्या ऱ्हदयात धडकी भरविणारे टी. एन. शेषन : निवडणुकीचा चेहरा बदलवणारे व्यक्तिमत्व

या फोनमध्ये ८जीबी आयपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज कपॅसिटी आहे. हा फोन ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ जी८८ प्रोसेसरसह उपलब्ध आहे. बॅटरीची क्षमता पाच हजार एमएएच आहे. ३३ व्होल्ट फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. परंतु हा फोन केवळ फोर जी पुरताच वापरता येणार आहे. फाईव्ह जी नेटवर्क या फोनमध्ये वापरता येणार नाही. यात फिंगर प्रिंट स्कॅनरसह ड्युअल कॅमेरा आहे. यात एक ६४ मेगापिक्सल व दुसरा दोन मेगापिक्सल इन डेप्थ सेन्सर असलेला कॅमेरा आहे. पुढचा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.

हेही वाचा- इव्हीएम विरोधात विरोधक एकत्र येणार? : शरद पवारांच्या घरी झाली विरोधी नेत्यांची बैठक

रिअलमीची किंमत हा फोन ११ हजार ते १४ हजारापर्यंत ठेवली आहे. यावर विविध बॅँकांच्या ऑफर्सही आहेत. या फोनची विक्री सुरू झाली असून हा फोन रिअलमी स्टोअर आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. रेनी नाईट व सन शॉवर या रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)