माझा महाराष्ट्र :
महिला शेतात काम करत होती. इतक्यात शेतात पोलिसाच्या वर्दीत एक पोलीस अधिकारी डीएसपी आला. तो आला आणि या महिलेशी गप्पा मारू लागला. महिलाही कौतुकाने त्याच्याशी गप्पा मारायला लागली. ती महिला त्या डीएसपीची आई होती, आणि तो मुलगा होता ग्वाल्हेरचे घाटीगाव एसडीपीओ संतोष पटेल. या भेटीचा व्हीडीओ पटेल यांच्या बरोबर असलेल्या एका कर्मचार्याने शूट केला असून पटेल यांनी तो समाजमाध्यमांवर टाकल्या टाकल्या सुमारे 80 लाख लोकांनी पाहिला. हा व्हीडीओ भलताच व्हायरल झाला आहे.
संतोष पटेल हे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरचे घाटीगाव पोलीस उपअधीक्षक आहेत. पटेल यांची कार्यपद्धती सामान्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत संघर्ष करत ते पोलीस अधिकारी झाले आहेत. सुरुवातीला ते वनरक्षक होते. त्यानंतर ते पोलीस अधिकारी झाले. पाच वर्षांनंतर पटेल पहिल्यांदाच वर्दीवर आपल्या गावी आले होते. यावेळी त्यांच्या आई शेतात काम करायला गेल्या होत्या. यावेळी पटेल थेट वर्दीवरच शेतात गेले. यावेळी आई आणि त्यांच्यातील संवादाचा व्हीडीओ एका पोलीस कर्मचाऱ्यांने शूट केला. हा संवाद लोकांना प्रचंड आवडला. फक्त 48 तासांत हा व्हीडीओ 80 लाख लोकांनी पाहिला.
गृहमंत्री अमित शहा यांचा या भागात दौरा होता. यानिमित्त ते सतना येथे ड्युटीवर होते. तेथून परतत असताना संतोष पटेल थेट गणवेशातच आपल्या घरी गेले. आई घरी नसल्याने ते तसेच शेतात आईला भेटायला गेले. यावेळी त्यांचा त्यांच्या मातृभाषेत संवादही झाला.
या व्हीडीओत आई आणि मुलातला संवाद ऐकू येतो. संतोष आईला म्हणतात, हे काय करतेय? यावर आई म्हणतेय की काय करणार, म्हैस पाळली तर तिला खाऊ घालावे लागेल. त्यासाठी चारा कापावा लागेल. दुध-तुपाशिवाय राहावलं जात नाही. यावर संतोष म्हणतात, की हे सगळं पैसे देऊन विकत घे. त्यावर आई संतोष यांच्या बरोबर असणार्या कर्मचाऱ्यांला सांगतात, की आमचं प्रेम नाही ऐकत. मुलांसाठी दोन पैसे साठवून ठेवायचे असतात. आई आपल्या मुलांसाठी काही ना काही विचार करून ठेवत असते. त्यावर संतोष आईला चल आणि ग्वाल्हेरला येऊन राहा, असते म्हणतात, यावर आई म्हणतात, की इथं सगळं कोण पाहील? संतोष आपल्या आईला किती कमाई होते? असे विचारतात, यावर आई म्हणजे दूध, तुप विकून महिन्याला दहा ते पंधरा हजार कमावते.
पटेल यांचे आयुष्य खडतर असेच होते. पन्ना जिल्ह्यातील देवगाव येथे त्यांचे घर आहे. त्याच गावातील सरकारी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. पुढील शिक्षण त्यांनी पन्ना येथे घेतले. त्यानंतर त्यांनी आयआयटी उत्तीर्ण करून भोपाळमधून सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केली. त्यानंतर त्यांना वनरक्षकाची नोकरी लागली. ही नोकरी करता करताही त्यांचा अभ्यास सुरूच होता. अखेर 2018 साली त्यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली.
DSP son came to meet the mother working in the field: the conversation between the two went viral
If you have any doubt, then contact me