". दागिने लुटण्यासाठी भुयार खणले, पण निघाले भलतीकडेच

दागिने लुटण्यासाठी भुयार खणले, पण निघाले भलतीकडेच

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :

ज्वेलरी शॉप लुटण्यासाठी चोरट्यांनी भुयार खणले; पण ते भुयार दुसऱ्याच दुकानात उघडल्याने चोरट्यांचा चांगलाच हिरमोड झाला. ही घटना मेरठमध्ये नुकतीच घडली. याच दुकानात अशाच प्रकारे आधी एकदा यशस्वी चोरी झालेली आहे. मेरठमध्ये भुयार खणून चोरी करण्याचा हा तिसरा प्रकार असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी मेरठमधील नौचंडी भागातील गढ रस्त्यावरील प्रिया ज्वेलर्स लुटण्याचे ठरवले होते. त्यासाठी भुयार खणण्याची त्यांची आयडिया होती. त्यासाठी मोठे कष्ट घेऊन भले मोठे भुयार खणलेही; मात्र या भुयाराचे टोक भलत्याच दुकानात निघाले. त्यामुळे चोरट्यांचा डाव फसला असून सर्व कष्टही वायला गेले आहेत. भुयाराचे टोक ज्या दुकानात निघाले त्या दुकानात काहीच नव्हते. तेथे लुटण्यासाठी कोणताच ऐवज नव्हता. चोरट्यांचा ज्वेलरी शॉप लुटण्याचा इरादा होता

मागच्या वर्षी म्हणजे 25 ऑगस्ट 2022 मध्ये चोरट्यांनी याच पद्धतीने भुयार खणून हेच दुकान लुटून लाखोंचा माल लुटला होता. तेव्हा सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. अशा प्रकारे भुयार खणण्याची ही तिसरी वेळ असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत निषेध नोंदवला आहे. आरोपींना लवकरच अटक करू, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

भुयाराचे सुरुवातीचे टोक पोलिसांना सापडू नये, म्हणून चोरट्यांनी जाताना भुयार मध्येच बुजवून टाकले. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांनी कुठून भुयार खणण्यास सुरुवात केली, हे अजून शोधता आलेले नाही. शेजारचे दुकान दुसऱ्या दिवशी उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Thieves dug the tunnel to steal the jewels, but went the other way

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)