". न्यायालयाने सुनावली नमाज पढण्याची शिक्षा : सलग 21 दिवस करायचे अनोख्या शिक्षेचे पालन

न्यायालयाने सुनावली नमाज पढण्याची शिक्षा : सलग 21 दिवस करायचे अनोख्या शिक्षेचे पालन

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :

एका दहा वर्षे जुन्या प्रकरणात दोषी आढळलेल्या एका व्यक्तीला न्यायालयाने रोज सलग 21 दिवस दिवसातून पाच दिवस नमाज पढायची व दोन वृक्षांचे रोपन करून त्यांचे जतन करण्याची शिक्षा सुनावली आहे. संपूर्ण राज्यभर या अनोख्या शिक्षेची चर्चा होत आहे.

हे प्रकरण मालेगाव येथील आहे. सन 2010 सालचे हे प्रकरण आहे. मालेगावचे अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका 30 वर्षे युवकाला दहा वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवले. शिक्षा म्हणून त्याला मशिदीच्या परिसरात सलग 21 दिवस रोज दोन झाडे लावायला लावून दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यास सांगण्यात आले आहे. रौफ खान असे या शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या व्यक्तीवर दोन प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. दुसऱ्या प्रकरणात त्याला निर्दोष मुक्त केले आहे. या निकालानंतर रौफ खान याने आपण केवळ 21 दिवस नाही, तर संपूर्ण आयुष्यभर नमाज अदा करणार असल्याचे म्हटले आहे.

मोह्ममद शेख यांनी मालेगावातील कॅम्प पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदविली होती. त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी क्रांती नगर भागात ते गेले असता त्यांनी त्यांची गाडी तेथे पार्क केली होती. त्यांच्या गाडीला रौफ खान याच्या रिक्षाने धडक दिली होती. वरून आमच्या घराबाहेर गाडी पार्क का केली म्हणून खान याने त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चार साक्षीदारांचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले; परंतु त्याला सुधारण्यासाठी अशी शिक्षा सुनावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या शिक्षेची राज्यभर चर्चा सुरू आहे.

याबाबत न्यायालयाने सांगितले, की प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स अ‍ॅक्ट, 1958 च्या कलम तीनने न्यायालयाला सूचना किंवा योग्य ताकीद दिल्यानंतर सोडण्याचा अधिकार दिला आहे. जेणेकरून आरोपीला सुधारण्याची संधी मिळावी व त्याने असे गुन्हे परत करू नये. परंतु केवळ समज पुरेशी होणार नाही. दोषीला समज लक्षात राहणेही आवश्यक आहे. त्याने आरोपी गुन्ह्याची पुनरावृत्ती करण्याची शक्यता राहात नाही.

या निर्णयानंतर खान यांना गुन्हा घडलेल्या सोनापुरा मशिदीच्या आवारात रोज पाच वेळा नमाज अदा करायची असून मशिदीच्या आवारात दोन झाडे लावून त्यांची निगा राखायची आहे. 

Court pronounces punishment for offering Namaz: 21 consecutive days of unique punishment to be obeyed

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)